जळगाव-भुसावल दुहेरी हत्याकांडातील जखमीचा उपचारा दरम्यान मुत्यु

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

भुसावळ(जळगाव)– सवीस्तर व्रुत्त असे की भुसावल  तालुक्यातील कंडारीत जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती तर या घटनेतील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता या हत्याकांडातील मृतांची संख्या तीन झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या वीटभट्टी कामगार भावंडांची जुन्या वादातून दहा संशयितांनी चाकू, तलवार व लोखंडी रॉड डोक्यात मारून निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कंडारी गावातील महादेव टेकडी परीसरातील पूजा पान सेंटरजवळील वखारीजवळील चौकात घडली होती.

या घटनेत या रमेश अमोल इंगळे (32, सर्व रा. कंडारी) हे व विकी साळुंखे (30) हे जखमी झाले होते तर त्यातील रमेश इंगळे यांचा उपचार सुरू असताना गोदावरी रुग्णालयात रविवारी पहाटे तीन वाजता मृत्यू झाला. खून प्रकरणी विकास साळुंखे यांच्या फिर्यादीवरून दीपक छगन तायडे, मनोज श्रावण मोरे, अमोल कोळी, मयूर कोळी, देवी भील, किरण सपकाळे व अन्य चार अनोळखींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, खून प्रकरणी दीपक छगन तायडे व मनोज श्रावण मोरे व किरण सपकाळे (तिन्ही रा. कंडारी,सता. भुसावळ)) या तीन संशयितांना अटक करण्यात आली. खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ शहरचे पोलिस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!