
चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केले २ गावठी बनावटीचे पिस्टल,२अटकेत…
चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केले गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र कट्टे व जिवंत काडतुस,२ आरोपीसह मुद्देमाल जप्त….
चोपडा(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(२३)रोजी रात्री ०२.०० वाजता चोपडा ग्रामीण पो.स्टे. च्या पोलिसाना एक गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की सत्रासेन मार्गे एक राखाडी रंगाची ईर्टिगा गाडी क्रमांक
MH.१२.RF.१४९६ या गाडीत तीन इसम गावठी कट्टा (पिस्टल) घेवुन निघाले आहेत.


असे समजल्या वरुन रात्रगस्त चे पोलीस कर्मचारी यांनी सापळा रचुन बुधगाव येथे थाबुन थोडयाच वेळात सदर गाडी आल्याने गाडी थाबवुन त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीत विनापरवाना ०३ गावठी कट्टे व ०८ जिवंत काडतुस व ८,४२,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यातील ईसम नामे

जफर रहीम शेख वय ३३ वर्षे रा. भाजी बाजार घोड नदी ता. शिरुर जि पुणे

तबेज ताहीर शेख वय २९ वर्षे रा. सेंटर दवाखाना समोर रिव्हेलीन कॉलनी ता. शिरुर जि. पुणे
कलीम अब्दुल रेहमान सय्यद वय ३४
यांचे वर चोपडा ग्रामीण पो.स्टे. सी.गु.र.न. ३३ / २४ भा. हत्यार कायदा कलम ०३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व वरील तीन्ही आरोपी यांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलिस करताय
सदर कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,अपर पोलिस अधीक्षक चाळीस गाव परिमंडळ कवीता नेरकर पवार, उपविभागीय पोलिस अधीकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण चे प्रभारी पोलिस अधिकारी कावरी कमलाकर, पो.ना. शंशिकांत पारधी, चालक पोहवा. किरण आसाराम धनगर, स.फौ. राजु महाजन,देवीदास ईशी,पोशि प्रमोद पारधी,मनिष गावीत विनाद पवार,महेद्र भिल,सदिप निळे,सैनिक श्रावण तेली,संजय चौधरी यांनी केली आहे.


