चाळीसगावात नगरसेवकावर गोळीबार करुन खुन करणाऱ्यास जळगाव पोलिसांनी केले जेरबंद….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चाळीसगाव शहरात नगरसेवकावर गोळीबार करुन खून केलेले ०२ फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केले जेरबंद….

चाळीसगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चाळीसगाव शहरातील नगरसेवक महेन्द्र उर्फ बाळु मोरे यांचेवर  दिनांक ७/२/२४ रोजी गोळीबार करुन त्यांचा खुन केला व पसार झाले होते त्यासंबंधाने पोलिस स्टेशन चाळीसगाव येथे  CCTNS नं. ५६/२०२४ भादंवि क.३०२,३०७, १२० (ब), १४३, १४४, १४७,
१४८, १४९, आर्म अॅक्ट क. ३/२५ प्रमाणे  गुन्हा नोंद करण्यात आला होता





त्याअनुषंगाने डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक, जळगाव, कविता नेरकर, अपर पोलिस अधीक्षक, चाळीसगाव,अभयसिंग देशमुख, सहा. पोलीस अधीक्षक,उपविभागिय पोलिस अधिकारी चाळीसगाव उपविभाग यांनी  किसन नजनपाटील, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सदर गुन्हयांतील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले.त्याप्रमाणे  किसन नजनपाटील, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दि. ११/०२/२०२४ रोजी गोपनिय माहिती मिळाली की,



१) सचिन सोमनाथ गायकवाड रा.घाटरोड, चाळीसगाव ता. चाळीसगा, जि. जळगाव,



२) अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि.जळगाव

हे अहमदनगर व पुणे येथे गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस अंमलदार सफौ विजयसिंग धनसिंग पाटील, पोहवा सुधाकर रामदास अंभोरे,लक्ष्मण अरुण पाटील, नापोनाशि राहुल जितेंद्रसिंग पाटील यांना तात्काळ अहमदनगर व पुणे येथे रवाना केले. त्याप्रमाणे वरील पथकातील पोलिस अंमलदार यांनी
वरील आरोपीतांचा अहमदनगर व पुणे येथे गोपनिय माहितीच्या आधारे शोध घेत असतांना त्यांना माहिती मिळाली की, सदर आरोपी हे लोणीकंद परिसर, पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदर आरोपींना लोणीकंद परिसरात पिंजून काढून १) सचिन सोमनाथ गायकवाड वय २३ रा.घाटरोड, चाळीसगाव
ता. चाळीसगाव जि. जळगाव, २) अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख वय २३ रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव यांना शिताफिने ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक महेश्रवर रेड्डी,अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर,सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थागुशा  किसन नजन पाटील यांचे सुचनेप्पोरमाणे पोहवा अक्रम शेख याकुब,महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, शिवदास नाईक, नापोशि हेमंत पाटील,किशोर मोरे, पोशि ईश्वर पंडीत पाटील यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!