
सराईत चोरटा व घरफोड्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
सराईत मोटारसायकल चोरटा प्रविन स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,घरफोडीसह मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड….
जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक जळगाव यांनी जळगांव जिल्हयात मोटार सायकल चोरी व घरफोडीचे गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणने बाबत पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना सुचना दिल्या होत्या.


त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी सफौ अनिल जाधव, रवि नरवाडे,पोशि हेमंत पाटील, बबन पाटील यांचा पथक तयार करुन त्यांना अडावद पो स्टे हददीतील मोटार सायकल चोरी गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे बाबत सुचीत करुन शोध पथक रवाना केले होते. शोध पथकास गुप्त बातमीदार कडुन मिळालेल्या माहीती वरुन संशयीत इसम प्रविण लोटन कोळी वय ३० रा. सुटकार ता चोपडा यास ताब्यात घेवुन विचारपुस करता त्याने

अडावद पोलिस स्टेशन हददीत दोन घरफोडी चोरी, व एक मोटार सायकल तसेच धरणगांव पोलिस स्टेशन हददीत एक मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. निष्पन्न आरोपी प्रविण लोटन कोळी याने दिलेल्या कबुली वरुन त्याने अडावद पो स्टे हददीत

(०१) अडावद पो स्टे गुरन२६/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे, (०२) अडावद पो स्टे गुरन १५/२०२४ भांदवी कलम ४५४,३८०, (०३) अडावद पो. स्टे गुरन २७/२०२४ भादंवि कलम ४६१, ३८०
(०४) धरणगांव पो स्टे ८२/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पनन झालेले आहे. निष्पन्न आरोपी प्रविण लोटन कोळी याचे ताब्यातुन ५५०००/- रुपये कि.च्या दोन जुण्या मोटार सायकल जप्त करण्यात आले आहे. आरोपी यास गुन्हयाचे तपासकामी अडावद पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक डॅा महेश्वर रेड्डी,अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली


