
भुसावल येथील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा…
स्पा च्या नावाखाली भुसावळ येथील उच्चभ्रु वस्तीत चालनार्या वेश्याव्यवसायावर भुसावल SDPO यांचा छापा,सहा मुलींची केली सुटका…..
भुसावळ(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने भुसावळ उपविभागात विविध कायदेशीर कारवाया सुरु आहेत.
त्यानुसार आज दिनांक 03.03.2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना महेश नगर भागात माइंड अॅण्ड बॉडी स्क्रीन केअर स्पा या नावाखाली कुंटणखाना चालवित असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरुन भुसावळ येथील महेश नगर भागात विशाल शांताराम ब-हाटे व त्याची पत्नी पल्लवी विशाल ब-हाटे असे स्पा व बॉडी स्क्रीन केअर व्यवसायाच्या नावा खाली स्वतःच्या घरात आर्थिक फायद्या करीता महिलांना पैशाचे अमिष देवुन, देह व्यापारास प्रवृत्त करुन त्यांचे कडून देह व्यापार करुन घेतात. अशी गुप्त माहीती मिळाल्याने पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी,अपर पोलिस अधिक्षक,अशोक नखाते यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी त्यांचे अधिनस्त असलेले सपोनि रुपाली चव्हाण, सुदर्शन वाघमारे, मसफौ शालीनी वलके, सफौ प्रदिप अभिमन्यु पाटील, मपोहवा अश्विनी जोगी, अनिल गणपत झुंझारराव यांचे सहाय्याने सदर ठिकाणी दोन पंच व पंटरसह व पंचनाम्याचे साहित्यासह जावुन संध्या ५.१५ वा. छापा टाकला असता देह व्यापार चालविणारे विशाल शांताराम ब-हाटे, वय 38 व त्याची पत्नी पल्लवी विशाल ब-हाटे वय 39, दोन्ही रा. महेश नगर, भुसावळ व देह व्यापार करणारया पिडीत पाच महिला करमाळा, जि. सोलापुर, ह.मु.
मगरपट्टा पुणे, जामखेड, जि. अहमदनगर, पहुर, ता. जामनेर, जि. जळगांव, पिंपरी चिंचवड, पुणे, कुलाबा, मुंबई व येथील राहणा-या व दोन इसम मिळुन आले आहेत. सदर ठिकाणी देह व्यापारास लागणारे साहित्य मिळुन आले आहे.


सदरचे ठिकाण हे रहीवाशी वस्ती मधील असुन ब-हाटे पती पत्नी हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी व महिलांना पैश्याचे अमिष देवुन देहव्यापारास प्रवृत्त करुन त्यांचे कडून देह व्यापार करुन घेत होते. अश्या प्रकारचे अनैतिक व्यापार व असमाजीक कृत्य करणारया इसमा विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी,अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते,उपविभागिय पोलिस अधिकारी,भुसावळ क्रुष्णात पिंगळे,वाहतुक शाखेच्या सहा.पोलिस निरीक्षक रुपाली चव्हान व अधिनस्त अंमलदार यांनी केली



