
किराणा मालाच्या गाडीत गुटखा वाहतुक करणारा चोपडा ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…
चोपडा ग्रामीण पोलिसांनी रात्रगस्ती दरम्यान किराणामालाच्या गाडीत अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा घेतला ताब्यात…
चोपडा(जलगांव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक २१/०२/२०२४ रोजी मध्यरात्री रात्रगस्ती दरम्यान चोपडा ग्रामीण पोलिसाना मिळालेल्या गोपनीय माहीती वरुन मध्यप्रदेशातुन येणा-या कीराणा मालाच्या पिकप वाहनातुन शेंदवाकडुन धुळेकडे जानार्या चोपडा शिरपुर रोड वरील हातेड फाटा येथे बंदी असलेल्या १,९४,४८०/- रु कीमतीचा विमल पान मसाला
३४,३२०/- रु कीमतीचे सुगधीत तबाखु व ४,५०,०००/- रु कीमतीची व पांढ-या रंगाची बोलेरो पिकप असा एकुण ६,७८००० रु कीमतीचा माल घेऊन जाताना आरोपी प्रशांत मानीको भिल रा. हेकंयवाडी ता. जि. धुळे यांचे ताब्यातुन जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कामगीरी डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर,अपर पोलिस अधीक्षक, चाळीसगाव,उपविभागिय पोलिस अधिकारी,चोपडा कुनाल सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पो.स्टे. चे पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, स.पो.नी नितनवरे, पोहवा शशी पारधी,पोशि मनीष गावीत,सदिप निळे, यांनी केली आहे.




