गावठी कट्याची विक्री करणारे चोपडा ग्रामीण पोलिसांचे तावडीत सापडले…
अवैधरित्या गावठी कट्टयाची विक्री करणारे रेकॅारडवरील गुन्हेगारांना त्यांचे साथीदारांसह चोपडा ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात,९ गावठी कट्ट्यासह ४ आरोपींना घेतले ताब्यात….
चोपडा(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.१०/०३/२०२४ रोजी पारउमर्टी येथील दोन इसम हे अवैध अग्नीशस्त्राची विक्री करणार असुन सदरचा सौदा हा कृष्णापुर ता. चोपडा शिवारात उमटी रोडवरील घाटात होणार असलेबाबत माहीती मिळाली होती. त्याप्रमाणे कृष्णापुर ते उमर्टी जाणारा डोंगराळ भागातील कच्चा रस्त्यावरील घाटातील मंदीरापासुन थोडे पुढे उमर्टी गावाकडेस चढती जवळ सदर दोन मोटारसायकलवर ४ इसमांकडे काहीतरी संशयीत गोणीमध्ये असल्याचे संशय आल्याने त्यांचेवर छापा टाकून त्यांना जागीच पकडले असता व त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांचे नाव १) हरजनसिंग प्रकाशसिंग चावला वय २० वर्ष, रा. पारउमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी, (म.प्र)
२) मनमीतसिंग धृवासिंग बर्नाला वय २० वर्षे, रा. पारउमर्टी, ता. वरला, जिल्हा बडवाणी (म.प्र),
३) अलबास दाऊद पिंजारी वय २७वर्षे, रा. महादेव चौक बाजार पेट हरिविठ्ठल नगर, जळगांव ता. जि. जळगांव
४) अर्जुन तिलकराज मलीक वय २५ वर्षे, रा. एकता नगर, चमरंग रोड अमृतसर, राज्य पंजाब
असे असल्याचे सांगीतले. त्यानंतर त्यांची अंगझडती घेता
त्यांचे कडील गोणीमध्ये ९ गावठी कट्टे, २० जिवंत काडतुस, व २ रिकाम्या मॅग्झिन असा मुद्देमाल मिळून आला. त्यांचे जवळील सदर गोणी ताब्यात घेत असतांना सदर चारही इसमांनी पोलीसांचे तावडीतुन सुटुन पळुन जाण्यासाठी हुज्जत घालुन पोलिस कर्मचाऱ्यांशी हातापायी करुन शिवीगाळ व धक्का बुक्की केली. त्यावेळी त्यांचे ताब्यातील २ मोटार सायकलली १) क्रं. एम एच १९ ई एफ ३७९३, २) एम पी ६९ एम ए १८४८ व ४ मोबाईल हॅण्डसेट असे मिळून आले. असा एकुण ४,०७,४००/- रु किं ९ गावठी कट्टे, २० जिवंत काडतुस, व २ रिकाम्या मॅग्झिन, ४ मोबाईल हँण्डसेट व २ मोटार सायकलीसह मिळून आला आहे. सदरचे गावटी कट्टे मिळून आल्याने पोहवा शशीकांत हिरालाल पारधी नेम चोपडा ग्रामीण पो स्टे यांनी फिर्याद दिल्यावरून चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन CCTNS गुरनं.३९/२०२४ भादवि कलम ३५३, ५०४, ३२३, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५,म.पो.अॅक्ट कलम ३७(१) (३) चे उलंघन १३५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
दि.१०/०३/२०२४ रोजी आरोपी १) हरजनसिंग प्रकाशसिंग चावला वय २० वर्ष, रा. पारउमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी, (म.प्र) असे सांगीतले २) मनमीतसिंग धृवासिंग बर्नाला वय २० वर्षे, रा. पारउमर्टी, ता. वरला, जिल्हा बडवाणी (म.प्र), ३) अलबास दाऊद पिंजारी वय २७ वर्षे, रा. महादेव चौक बाजार पेठ हरिविठ्ठल नगर. जळगांव ता. जि. जळगांव ४) अर्जुन तिलकराज मलीक वय २५ वर्षे, रा. एकता नगर, चमरंग रोड अमृतसर, राज्य पंजाब यांना
अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई हि पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी जळगांव, अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर चाळीसगांव परि. उपविभागीय पोलिस अधिकारी कुनाल सोनवणे चोपडा विभाग चोपडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोहवा शशीकांत पारधी,किरण पाटील,पोशि गजानन पाटील, संदिप निळे, ग्रुहरक्षक थावन्या वारेला, सुनिल धनगर, श्रावण तेली, संदिप सोनवणे सर्व नेमणुक चोपडा ग्रामीण पो.स्टे. यांनी केली आहे. तसेच अलबास दाऊद पिंजारी वय २७ वर्षे, रा. महादेव चौक बाजार पेट हरिविठ्ठल नगर जळगांव ता. जि.जळगांव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर राज्यात एकुण ९ ते १० गुन्हे दाखल आहेत.