Methaqulone या किंमती अंमली पदार्थाची विक्री करणारे तिघे भुसावळ पोलिसांचे ताब्यात..,
बाजारपेठ भुसावल पोलिसांनी पकडला ७३ लक्ष रु किंमतीचा अंमली पदार्थ,तिनं आरोपी ताब्यात….
भुसावल(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी व अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी तसेच अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी त्याबाबत सर्व प्रभारींनी वरीष्ठांकुडन वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने भुसावळ शहरात गुंगीकारक औषधीद्रव्ये मोठ्या प्रमाणात विकली जातात या गोपनीय माहिती काढण्याचे काम सुरू होते त्यानुसार भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील हॉटेल मधुबन येथे संशईत इसम गुंगीकारक औषधाची विक्री करतात अशा माहीतीवरुन मानवी जिवीतास अपायकारक अंमली पदार्थ स्वतःचे कब्जात बाळगुन त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने कृष्णात महादेव पिंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी भुसावळ यांच्या लेखी आदेशाने हॉटेल मधुबन भुसावळ येथे सापळ्याचे नियोजन करण्यात आले. पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांनी त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव,गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा विजय नेरकर,निलेश चौधरी,रमण सुरळकर,यासीन पिंजारी,महेश चौधरी,पोशि प्रशांत सोनार,योगेश
महाजन, प्रशांत परदेशी,सचिन चौधरी,जावेद शाह,राहुल वानखेडे, भूषण चौधरी,अमर आढाळे, सोबत दोन शासकीय पंच अशांनी बनावट ग्राहक पाठवून वरील नमृद ठिकाणी तिथे उपस्थित ईसम यांचे नाव विचारले असता तसेच त्याची झडती घेतली असता त्याने त्याचे नाव १)कुणाल तिवारी वय 30 वर्षे, रा. प्लॉट नं. 24, तापी नगर,भुसावळ, 2) जोसेफ जॉन वालाड्यारेस, वय 28 वर्षे, रा. रामायण नगर, कंटेनर यार्ड, वरणगांव रोड, भुसावळ असे सांगितले त्याचे अंगझडतीमध्ये 910 ग्रॅम सफेद रंगाचे दाणेदार पदार्थ मिळून आला सदर दाणेदार पदार्थाची घटनास्थळावरच जळगांव फॉरेन्सिक युनीटच्या तज्ञांमार्फत प्राथमीक रासायनिक तपासणी केली असता सदर पदार्थ हा (Methaquilon) नावाचा मानवी जिवीतास अपायकारक अंमली पदार्थ असल्याची खात्री करण्यात आली.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास करतांना जप्त गुंगीकारक (Methaquilon) नावाचा मानवी जिवीतास अपायकारक अंमली पदार्थ हे यातील तिसरा आरोपी दिपेश मुकेश मालवीय, रा. शेर ए पंजाब हॉटेल वरणगाव रोड भुसावळ याने विक्री करीता पुरवली आहेत असे निष्पन्न झाले आहे. त्याप्रमाणे आरोपी दिपेश मालवीया यांस तपासकामी नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन नमुद गुन्ह्यांत एकुण 73,00,000 /- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.व फिर्यादी पोशि प्रशांत निळकंठ सोनार, वय 33 वर्षे, बाजारपेठ पो.स्टे. भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिन्ही आरोपीविरुद्ध भुसावळ बाजारपेठ गुन्हा रजिस्टर नंबर 72/24, NDPS act 1985 कलम 8(क), 21 (क), 22 (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन तिन्ही आरोपींना अटक करुन भुसावळ न्यायालयात हजर केले असता आरोपींची 02 दिवस पोलिस कोठडी प्राप्त करण्यात आली आहे. गुन्हाचा तपास पो. उपनि. मंगेश जाधव ,पोशि योगेश महाजन असे मिळुन करीत असून स्वतंत्र पथकामार्फत इतर आरोपींचा शोध घेत आहोत.
सदरची कानगिरी पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी व अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात पिंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी भुसावळ, गजानन पडघन पोलिस निरीक्षक बाजारपेठ पोलिस ठाणे,मंगेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक तसेच DB पथकातील पोहवा विजय नेरकर,निलेश चौधरी, रमण सुरळकर,यासीन पिंजारी,महेशचौधरी,पोशि प्रशांत सोनार,सचिन चौधरी,योगेश महाजन,प्रशांत परदेशी,जावेद शाह, राहुल वानखेडे,भुषण चौधरी,अमर आढाळे, यांनी ही कारवाई केली आहे.