MIDC जळगाव पोलिसांनी उघड केले मोटारसायकल चोरीचे गुन्हे,६ मोटारसायकल केल्या जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

एमआयडीसी जळगाव पोलिसांनी आरोपींकडून 6 मोटारसायकली केल्या जप्त करुन उघड केले मोटारसायकल चोरीचे गुन्हे….

जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करून आरोपींकडून चोरी केलेल्या 06 मोटारसायकल ह्या जप्त केल्या आहेत. मध्यप्रदेश येथे आरोपी नामे 1) अनोप धनसिंग कलम कोरकु, (वय 18 वर्षे), निवासी- सुकवी थाना, खालवा, जिल्हा खंडवा मध्यप्रदेश, 2) अंकीत सुकलाल ठाकुर, (कोरकु), (वय 22 वर्षे), निवासी- अरविंद नगर, मुसाखेडी इंन्दौर, मध्यप्रदेश यांचेकडुन एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून 06 वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकली चोरट्यांनी चोरी केल्या आहेत. अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार एक पथक तयार करुन तपास करून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर आरोपीतांना खंडवा कारागृहातुन ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयात अटक करुन त्यांनी पोस्टे. हद्दीतुन 06 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी यांचेकडुन खालील प्रमाणे मोटारसायकल ह्या काढून घेतल्या आहेत.





1)काळया रंगाची हीरोहोंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एमएच 19 इइ 1648 चेसीस, 2)बजाज कंपनीची पल्सर मो.सा.क्र. एमपी 12 एमवाय 9247, 3)होंडा कंपनी कि ड्रीमयुगा क्र.एम.एच 19 बी.वाय 9462, 4)होंडा युनीकॉर्न मो.सा.क्र. एमएच 19 सीक्यु 4931, ड्रीम युगा मोटार चिन्ह क्र.MH 19 ED 5634 पीसी जु.वा.कि.अं.,5)होन्डा कंपनीची चॉकलेटी रंगाची एम.पी. 10 एम.यु. 5784 शाईन गाडी आदी मोटारसायकल ज्यांची किंमत 185,000/- रुपये ह्या आरोपींनी काढून दिल्या आहेत.



सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी. दिपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सफौ.अतुल वंजारी, पोहवा. गणेश शिरसाळे, गफुर तडवी, नापोशि.सुनील सोनार, विकास सातदीवे, योगेश बारी, पोशि छगन तायडे यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!