रावेर पोलिसांनी अवैधरित्या विक्रीकरीता जाणारा गुटखा पकडला….
रावेर पोलिसांची अवैध गुटखा विरोधी कारवाई…
रावेर(जळगाव)प्रतिनिधी – जिल्ह्यात वाढती गुटखा-तंबाखू तस्करी पाहता, अवैध गुटखा वाहतूकीवर लक्ष ठेऊन कार्यवाही करणे संदर्भात पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अशोक नखाते अपर पोलिस अधिक्षक जळगाव, अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलिस अधिक्षक फैजपुर, यांनी आदेशीत केले होते. त्या नुसार रावेर पोलिसांचे पथक करवाईसाठी गस्तीस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून पथकाने एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून १ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.१६एप्रिल) रोजी पोहेकॉ. ईश्वर चव्हाण, पोकों विशाल पाटील, पोकों सचिन घुगे, पोको प्रमोद पाटील पोकों महेश मोगरे हे रावेर शहरात सकाळी ०९.०० ते दुपारी १२.०० या दरम्यान पेट्रोलिंग करीत होते. त्या दरम्यान रावेर बस स्टँड मध्ये पेट्रोलिंग करीत असताना सकाळी ११.३० वा मुमारास रावेर बस स्टँड येथे एका झाडाखाली एक इसम बसलेला दिसला व त्याचे जवळ रेग्झिनची पांढऱ्या रंगाच्या ०३ गड्ढे दिसले, त्याने पाहताच घाईघाईने त्याच्या जवळील गड्ढे उचलण्याच्या तयारीत होता, त्याच्या सदरच्या हालचाली संशयित वाटल्याने त्यास पोलिस स्टेशन येथे चौकशी कामी घेवुन आलो व त्याची चौकशी केली असता त्याचे जवळील बॅग मध्ये पांढऱ्या रंगाच्या ०३ गड्ढे झडती घेतली असता त्यात महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेला विमल गुटख्याचा साठा आढळुन आला. सदरबाबत त्यांना विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, मी सदरचा माल बुरहानपुर येथील आशिष एंटरप्राईजेज चे मालक प्रितेश सेट यांचेकडुन विकत घेऊन बसने पारोळा येथे विक्रीसाठी घेवुन जात आहे व पारोळा येथे जाणेसाठी बसची वाट बघत आहे असे सांगितले.
त्याच्या जवळ १,०३,५००=००/- रू. प्रतिबंधीत साठा मिळून आला. त्याचे नाव रमेश रूपचंद पाटील, (वय ७४ वर्षे), रा.शनि मंदिराजवळ, पारोळा, ता.पारोळा, जि. जळगांव. असे त्याने सांगितले. सदरचा साठा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी बंदी असल्याने पो.काँ विशाल शिवाजी पाटील, यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे अन्नपदार्थ हे महाराष्ट्र राज्यात अन्नसुरक्षा आयुक्त यांची अधिसुचना क्रमाक असुमाअ/अधिसुचना ७९४/२०१८/७ दि.२०/०७/२०१८ नुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टीने प्रतिबंधीत करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अशिष आडसुळ हे करीत आहेत.
अशा प्रकारे सदर कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अशोक नखाते, अपर पोलिस अधिक्षक जळगाव अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलिस अधिक्षक फैजपुर, पोनि डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक अशिष अडसुळ, पोना ईश्वर जुलालसिंग चव्हाण, सचिन पुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, यांच्या पथकाने केली आहे.