कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणार्यावर भुसावळ उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाचा छापा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

भुसावळ तालुका पोलिस ठाणे हद्दीमध्ये कोंबडयांच्या झुंझी लावुन त्यावर पैशांचा हार जितचा जुगार खेळणार्यावर उपविभागिय पोलिस अऱ्धिकारी यांचे पथकाचा छापा, ११ इसम घेतले ताब्यात…

भुसावल(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी लोकसभा निवडणुका अनुषंगाने अवैध धंदे, जुगार यावर कारवाई करणेबाबत आदेशीत केलेले होते, त्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी , भुसावळ  कृष्णांत पिंगळे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, भुसावळ तालुका पोलिस ठाणे हद्दीमध्ये कुन्हा या गांवी एका शेताचे बाजुला सार्वजनीक जागी काही इसम बसुन ते
फायटर कोंबडयांच्या झुंझी लावुन त्यावर पैशांचा हार जितचा जुगार खेळ खेळत आहे.





सदर बातमीबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अंमलदार पोहवा सुरज पाटील यांनी सदर बातमीची खात्री करुन
इंत्यभुत माहिती गोळा करुन उपविभागीय पोलिस अधिकारी ,भुसावळ  कृष्णांत पिंगळे यांना सांगीतली, त्यानुसार आज दि. ०८/०३/२०२४ रोजी सदर बातमीबाबत भुसावळ तालुका पोलिस ठाणे पोनि .जगताप, सपोनि  पाटील यांचे समक्ष अंमलदार यांना सांगुन सदर बाबत कायदेशिर कारवाई करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.सदर बातमीप्रमाणे मौजे कुन्हा शिवारात, रईस बागवान यांच्या लिंबुच्या मळया शेजारी असलेल्या
परीसरात झुंडुपामध्ये १५/१६ इसम हे कोबंडयांच्या झुंझी लावुन त्यावर पैशांचा हार जितचा खेळ खेळतांना व काही ईसम त्यांना प्रोत्साहन देतानां मिळुन आले म्हणुन त्यांचेवर छापा टाकुन कारवाई करण्यात आली. सदर ठिकाणी ११ लोक त्यांचेकडील २०००/- रु किंमतीचे ०२ फायटर कोंबडे, ३,६००/- रु रोख, ६,०००/- रु किंमतीचे ०६ मोबाईल फोन व ५,७५,००० /- रु किंमतीच्या एकुण १४ मोटर सायकली असा एकुण ५,८६,६०० /- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यातील आरोपी नामे शेख
सईद शेख सादीक, वय – २३ वर्षे, २) शेख जावेद शेख हाफीज, वय – ३८ वर्षे, ३) आशिष राजेश सोनी, वय – २१ वर्षे, ४) नेलसन लेनीन पेट्रो, वय – ४३ वर्षे, ५) शेख आरीफ शेख युसुफ, वय – ३१ वर्षे, ६)
मोसीन शेख युसुफ, वय – ३२ वर्षे, ७) शेख सलमान शेख सलीम, वय – २६ वर्षे, ८) रशीद सैय्यद निसार, वय – ४२ वर्षे, ९) शेख शेहबाज शेख अकबर, वय – २३ वर्षे, १०) अर्जुन बादल गरड, वय – २४ वर्षे,११) शेख इमाम शेख याकुब, वय – ३८ वर्षे व इतर ०५ ते ०६ अनोळखी पाहीजे आरोपी यांचेविरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाणे येथे  गु.र.नं. ४१/ २०२४ कलम १२ (ब), (क) महाराष्ट्र
जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन अधिक तपास चालू आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, जळगांव परीमंडळ जळगांव  अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी, कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलिस ठाणेचे प्रभारी पोलिस निरीक्षक  बबन जगताप, सपोनि विशाल पाटील, सफौ विठ्ठल फुसे, पोहवा युनुस शेख, संजय तायडे,प्रेमचंद सपकाळे,संजय भोई,नापोशि जितेंद्र सांळुखे, पोशि  विशाल विचवे, जगदिश भोई सर्व नेमणुक भुसावळ तालुका पो स्टे तसेच पोहवा सुरज पाटील, संकेत झांबरे नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय
भुसावळ यांनी केलेली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!