
दरोड्याचे तयारीत असलेले सराईत दरोडेखोर जालना स्थागुशा पथकाच्या तावडीत सापडले…
जालना परीसरातील शेत शिवारात दरोड्याचे तयारीत असलेले 7 दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात किंमती मुद्दे माला विरुध्द गुन्ह्यावर अंकुश ठेवण्याचे व गुन्हेगारावर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. आज दिनांक 02/02/2024 रोजी मौजे देवमुर्ती शिवारात 7 इसम हे माला विरुध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याचे इराद्याने त्यांची ओळख लपवुन बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना मिळाली. त्यावरुन रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे विशेष पथक तयार करुन कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. मौजे देवमुर्ती शिवारात स्थानिक गुन्हे शाखा जालना येथील पथकाने अचानक छापा मारला असता, सात इसम हे पोलिसांना पाहुन पळुन जात असतांना त्यांना स्थानिक गुन्हे शाखा जालना येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी व मौजे देवमुर्ती शिवारातील शेतकऱ्यांनी पाठलाग करुन पकडले. इसम


1) मंजु कुटंम भोसले, वय – 45 वर्ष, रा. अंधेरा, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा

2) नशीब उदरु भोसले, वय-24 वर्ष, रा. अंधेरा, ता.देऊळगावराजा, जि. बुलढाणा

3)मुकेश अविनाश भोसले, वय-22 वर्ष, रा. वरदरा, ता. मेहकर, जि. बुलढाणा
4)नितीन अनिल भोसले, वय-22 वर्ष, रा. अंढेरा ता. देऊळगावराजा,
जि. बुलढाणा
5) विक्रांत विक्की शिंदे, वय – 23 वर्ष, रा. वाकी, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा
6) अनिकेत मंजु पवार, वय-19 वर्ष, रा. अंधेरा, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा
व एक विधीसंघर्षग्रस्त बालक असे सर्वजण त्यांची ओळख लपवुन मौजे देवमुर्ती शिवारात अथवा परिसरात दरोडा टाकण्याचे
पुर्व तयारीनिशी दरोडा घालण्याचे साहित्य सह एकत्र मिळुन आल्याने त्या सर्वा विरुध्द पोलिस ठाणे तालुका जालना येथे पोलिस उप निरीक्षक राजेंद्र वाघ यांचे तक्रारी वरुन कलम 399, 402 भादंवि सह कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक स्थागुशा जालना, सपोनि योगेश उबाळे, सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, विनायक कोकणे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, गोपाल गोशिक, विजय डिक्कर, रमेश राठोड, जगदीश बावणे, सुधिर वाघमारे, लक्ष्मीकांत आडेप, रुस्तुम जैवाळ, संभाजी तनपुरे, फुलचंद गव्हाणे,प्रशांत लोखंडे, सतिश श्रीवास, अक्रुर धांडगे, इरशाद पटेल, सचिन आर्य, कैलास चेके, रवि जाधव,किशोर पुंगळे, योगशे सहाने, धिरज भोसले, सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली


