
चारचाकी वाहनासह चोरीस गेलेला कापुस १२ तासाचे आत स्थागुशा पथकाने शोधुन घेतला ताब्यात…
टेंभुर्णी येथील कापसाने भरलेले आयशर चोरी करणारे सराईत गुन्हेगार 12 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, 35,50,000/- रु चा मुद्देमाल केला जप्त…..
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयातील किंमती मुद्देमालासंबंधी गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मालाविरूध्द चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.


त्यानुषंगाने दिनांक 03/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार हे टेंभुर्णी येथुन एक 100 क्विंटल कापसाने भरलेले आयशर चोरी गेल्या बाबत टेंभुर्णी पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं 41/2024 कलम 379 भादंवि मधील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती
मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे लक्ष्मण बाबुराव गाढे रा. भिवंडी बोडखा ता.अंबड जि.जालना याने केला असुन तो त्याच्या साथीदारासह आयशरमधील कापुस भिवंडी बोडखा शिवारात वेगवेगळ्या वाहनात भरून विक्री करण्यास जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी भिवंडी बोडखा येथे जावुन पाहणी केली असता भिवंडी बोडखा शिवारात एका गावरानामध्ये
चोरीस गेलेला एक लाल रंगाची आयशर ज्याचा क्र.MH-06-AQ-4375 असे रिकाम्या अवस्थेत मिळुन आला.

सदर आयशरमधील कापुस हा वेगवेळ्या वाहनाने पाचोड, गेवराई व अंबड येथे विक्रीसाठी नेला असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गेवराई हद्दीत उमापुर फाट्याजवळ दोन कापसाने भरलेले बोलेरो पिकअप क्र. MH 20 GC-4819 चा चालकाने त्याचे नाव
बाबासाहेब कोंडिबा गायकवाड वय 27 वर्षे व्यवसाय चालक रा. जुने पाचोड ता.पैठण जि. छ.संभाजीनगर व एक अशोक लिलैंड क्र. MH-20-GC -2230 च्या चालकाने त्याचे नाव अलिम मसुद मनियार वय 20 वर्षे चालक रा. फैजलपुरा, पाचोड ता. पैठण जि.छ. संभाजीनगर व पाचोड येथुन कापसाने भरलेला एक महिंद्रा कंपनीचा मॅक्स बोलेरो पिकअप पांढऱ्या रंगाचे ज्याचा क्रमांक MH 21 BH 6898 असा व अंबड येथे व्यापाऱ्याकडे कापुस विक्री करीत असतांना एक टाटा कंपनीचा छोटा हत्ती ज्याचा क्र. MH 42 M-3438 हा त्याचा चालक नामे संतोष शिवाजी कोल्हे वय 31 वर्षे व्यवसाय चालक रा. शिवाजीनगर, पाचोड ता. पैठण जिल्हा .छ.संभाजीनगर असे वेगवेगळ्या ठिकाणाहुन चोरीस गेला 100 क्विंटल कापुस व चोरीस गेलेले आयशर असे एकुण 35,50,000/- रूपयाच्या मुद्देमाल व तिन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेतले. सदर कापुस विक्री करण्यासाठी गेलेले वरील आरोपीतांनी विश्वासात घेवुन विचारपुस केली असतांना त्यांनी सदरचा कापुस हा आयशरसह लक्ष्मण बाबुराव गाढे रा. भिवंडी बोडखा ता. अंबड याने टेंभुर्णी
येथुन चोरून आणला व आम्हास विक्री करण्यासाठी आमच्याकडे दिला होता असे त्यांनी कबुली दिली.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल,अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि योगेश
उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अमंलदार, विजय डिक्कर, दत्ता वाघुंडे, सागर बावस्कर,देविदास भोजने, भागवत खरात, विलास चेके, योगेश सहाने व चालक सौरभ मुळे सर्व स्थागुशा, जालना यांनी केली आहे.



