
अवैध गांजा विक्रेत्यास गांजासह LCB ने घेतले ताब्यात…
स्थानिक गुन्हे शाखेने रोहिलागड शिवारातुन अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यास 4 किलो 154 ग्रॅम. गांजासह घेतले ताब्यात….
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना जालना जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांविरुध्द कार्यवाही करण्याचे सुचना दिल्या होत्या.


त्याअनुषंगाने दिनांक.12/04/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार हे अवैध धंद्याची माहिती घेत असतांना स्था.गु.शा.चे पथकास रोहिलागड शिवारात एक लिंबाचे झाडाखाली एक इसम पिवळया रंगाचे गोणीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी थांबलेला असल्याची माहिती मिळाली.

त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे रामेश्वर खनाळ, यांचेसह अधिकारी व अंमलदार यांनी दि. 12/04/2024 रोजी 4:20 वाजता रोहिलागड ते निहालसिंगवाडी रोडवरील महाजन कवाळे यांचे शेताजवळ एका लिंबाचे झाडाखाली बसलेल्या इसमावर छापा कारवाई करुन इमस प्रेमसिंग शामलाल कवाळे वय 40 वर्ष रा. निहालसिंगवाडी ता. अंबड जि. जालना यास ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन शासकिय पंचासमक्ष 83080/- रुपये किंमतीचा 04 किलो 154 ग्रॅम गांजा व 10000/- रुपये किंमतीचा मोबाईल असा एकुण 93,080/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार कृष्णा तंगे, रमेश राठोड, रुस्तुम जैवाळ, सचीन चौधरी,सुधीर वाघमारे, संभाजी तनपुरे, फुलचंद गव्हाणे, देविदास भोजने, सतीष श्रीवास, अक्रुर धांडगे, भागवत खरात सर्व स्थागुशा जालना चालक पोउपनि संजय राऊत व सौरभ मुळे यांनी केली आहे.


