पोलिस असल्याची बतावनी करुन लुटणारे जालना गुन्हे शाखेच्या ताब्यात…
पोलिस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणाऱ्यांना 02 सराईत आरोपींना अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,त्यांच्याकडुन 2,72,000/- रु चा मुददेमाल केला जप्त………
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (06) रोजी दुपारी 2:55 वा चे सुमारास नवीन मोंढा ते वरकड हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रोडवर दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी दिलीपराव दत्तु क्षिरसागर, वय 63 वर्ष, व्यवसाय शेती, रा. कडवंची, ता.जि. जालना यांना पोलिस असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडील दीड तोळयाची सोन्याची चैन व दोन तोळयाच्या दोन सोन्याच्या अंगठया हातचलाखी करुन काढुन घेतल्या यावरुन फिर्यादी यांचे तक्रारीवरुन पोलिस ठाणे सदर बाजार जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिस अधीक्षक अजय बंसल अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यानी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या त्याअनुषंगाने दि (07) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तांत्रिक विश्लेषण, माहितगार यांचे कडुन माहिती संकलित करुन गुन्हा हा अत्यंत शिताफिने उघड करुन गुन्हयातील आरोपी 1) तन्वीर हुसैन अजीज अली, वय-49 वर्ष, रा. हुसैन कॉलनी, चिद्री रोड, बीदर, जि. बीदर, राज्य कर्नाटक 2) जाफर हबीब वेग, वय-25 वर्ष, रा. शिवाजीनगर, परळी, ता. परळी, जि.बीड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्हयाचे
अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली व गुन्हयामध्ये हातचलाखी करुन फसवणुक केलेला रु.1,62,000/- किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठया व एक सोन्याची चैन असा मुददेमाल व गुन्हा करतांना वापरलेला टीव्हीएस अपाची मोटार सायकल व आरोपींचे मोबाईल असा एकुण रु.2,72,000/- रु मुददेमाल आरोपींकडुन ताब्यात घेऊन तो गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला असुन नमुद गुन्हयातील आरोपी यांनी गुन्हा करतांना वापरलेल्या मोटार सायकलबाबत अधिक माहिती
मिळविली असता सदर मोटार सायकल ही पुणे येथुन चोरी केलेली असल्याचे आढळुन आले असुन त्यावर पोलिस ठाणे कोंडवा, पुणे येथे गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपीनी आणखी अशाच प्रकारचे चंदनझिरा व भोकरदन हददीमध्ये गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल,अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि. योगेश
उबाळे, पोलिस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर,रामप्रसाद पव्हरे, सचिन चौधरी सर्व स्थागुशा, जालना यांनी केली आहे.