
नजरचुकीने दुसर्याच्या खात्यात ट्रान्सफर झालेली रक्कम मुळ व्यक्तीस परत मिळवून देण्यात जालना सायबर पोलिसांना यश…
जालना – सवीस्तर व्रुत्त असे की तक्रारदार श्री. दिपक आसाराम ठाकर रा. चौधरी नगर, ता.जि. जालना यांनी दि.२०/१०/२२ रोजी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फोनपे या वॉलेटवर युपीआय आयडी टाकला परंतु युपीआय आयडी चुकल्यामुळे त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून दुसऱ्याच खात्यात ५०,०००/-रू. ट्रान्सफर झाले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी संबंधित बँकांना वारंवार तक्रार केली परंतु त्यांना बँकेकडून काहीही मदत मिळाली नाही म्हणून तक्रारदार यांनी दि. २०/१०/२०२३ रोजी सायबर पोलिस ठाणे, जालना येथे लेखी तकार अर्ज केला होता. सदर तकार अर्जाच्या अनुषंगाने
सायबर पोलीसांनी तात्काळ सायबर सेफ पोर्टल व एनसीसीआर पोर्टलच्या सहाय्याने तांत्रिक तपास करून तक्रारदार यांची रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यावर वर्ग झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर तात्काळ स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याशी इमेलद्वारे पत्रव्यवहार करून संबंधित खातेधारकाची माहिती घेउन खातेधारक हा गोरेगांव (पू.), मुंबई येथील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असता संबंधित खातेधारकाशी संपर्क करून तक्रारदार यांची खात्यातून गेलेली संपूर्ण रक्कम ५०,०००/-रू. त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यात तब्बल एक वर्षानंतर पुन्हा रिफंड करण्यात जालना सायबर पोलिसांना यश आले आहे. यावेळी फिर्यादींच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलिस ठाणे येथे येउन सायबर पोलिसांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शालीनी नाईक,
सपोनि सुरेश कामुळे, सपोनि वडते, सफौ पाटोळे, पोहवा राठोड, पोना. /मांटे, मपोहवा पालवे,नागरे, पोशि भवर, गुसिंगे, मुरकुटे, व मपोशि दुनगहू यांनी केली आहे.
सायबर पोलीस ठाणेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज/लिंक/फोन/क्यू आर कोड आल्यास खात्री केल्याशिवाय आपल्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती व ओटीपी फोनद्वारे देऊ नये किंवा लिंकवर क्लिक /क्यू आर कोड स्कॅन करू नये. तसेच सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांनी तात्काळ हेल्प लाईन क्र. १९३० वर कॉल करून सायबर गुन्हयाची माहिती दयावी किंवा
www.cybercrime.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा सायबर पोलीस ठाणे, जालना येथे
तात्काळ संपर्क करावा.


