
अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा गोंदी पोलिसांचे ताब्यात…
महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधी गुटख्याची वाहतुक करणारे कंटेनर गोंदी पोलीसांच्या ताव्यात,वाहन व गुटख्यासह एकुन २२ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….
गोंदी(जालना)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणाऱ्या होळीचा सण तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक अजय बंसल यांनी सर्व प्रभारींना आपआपले हद्दीत नाकाबंदी,रात्रगस्तीवर भर देऊन अवैध धंद्यावर विशेष लक्ष द्यायला सांगितले त्याअनुषंगाने दिनांक 12/03/2023 रोजी ठाणेदार गोंदी सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिप खांडेकर हे स्टाप सह गोंदी
पोलिस स्टेशन हददीत पेट्रोलींग करत असताना त्यांना माहीती मिळाली की महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पान मसाला गुटखा व जाफराणी जद्रा यांनी भरलेला आयचर ट्रक हा सोलापुर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने जाणार आहे . सदर माहीतीची शहानिशा करुन, सदर ठिकाणी नाकाबंदी लावुन वडीगोद्री पुलाजवळील एस एस चौधरी ढाब्या जवळ आयशर क्र. आर जे 14 जी पी 9730 हा जात असताना त्यास थांबवुन खात्री केली असता सदर आयशरमधे राजनिवास गुटखा व प्रिमीयम जेड एल 01 जाफराणी जर्दा असा 14,11,200/- रुपपे व 22,00,000/- आयशर असा एकुन 36,11200/- रुपयाचा मुददेमाला मिळुन आला असुन त्यावरुन सहा. पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांचे फिर्यादी वरुन गोंदी पोस्टे गुरन 94/2024 कलम 188,328,272,273,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल असुन पुढील तपास पोउपनि जागडे हे करत असुन सदर गुन्हयात दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असुन त्याचे कडे नमुद गुटखा व जर्दा कोठुन कोठे व कोणाच्या सांगण्यावरुन कोणाकोणाला वाटप होणार होता याबाबत तपास चालु आहे . तसेच यांचा प्रमुख सुत्रधार कोण आहे यांचा देखील पोलिस शोध घेण्यासाठी वेगवेगळी पोलिस पथके रवाना केलेली आहेत .
सदर कारवाई पोलिस अधिक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी,उपविभागीय पोलिस अधिकारी अंबड विशाल खांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी परतुर विभाग बुधवंत यांचे मार्गदर्शनखाली सपोनि आशिष श्रीनिवास खांडेकर पोउपनि जागडे, परिपोउपनि किरण हावले, पोशि दिपक भोजने,राठोड,, साळवे सर्व गोंदी पोलिस स्टेशन आदीनी केली आहे.




