
अवैधरित्या धारदार तलवार बाळगनार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…
अवैध धारधार तलवार बाळगणा-या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
जालना(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात अवैध धारधार शस्त्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई
करण्याबाबत अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या.त्यावरुन . रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करुन कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 09/01/2024 रोजी माहिती मिळाली होती की, ईसम नामे सतिश रामकिसन साबळे वय 33 वर्षे, रा. कौठाळा ता. घनसावंगी
जि.जालना हा त्याचे राहते घरी स्वतःचे ताब्यात अवैध रित्या 01 धारधार तलवार बाळगुन आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ईसमांचा शोध घेतला असता तो त्याचे राहते घरी मौजे कौठाळा येथे मिळुन आल्याने त्याचे राहत्या घरातुन अवैध 01 धारधार तलवार मिळुन आली आहे. नमुद आरोपी विरुध्द पोहवा लक्ष्मीकांत
आडेप यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे घनसावंगी येथे गु.र.न. 09/2024 कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक स्थागुशा जालना, सहा. पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर,पोलिस अंमलदार विनायक कोकणे, लक्ष्मीकांत आडेप, देविदास भोजणे, भागवत खरात, कैलास चेके स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.




