गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
जालना (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना संबंधित सर्व सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
त्यावरुन अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करुन कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने (दि.02जानेवारी) रोजी पोलिस ठाणे कदीम जालना हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना माहिती मिळाली होती की, ईसम नामे अनिल गोरखनाथ जाधव (वय 37 वर्ष) रा.राहुल नगर, रेल्वे पटरी जवळ जालना हा स्वतःचे ताब्यात अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगुन आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ईसमांचा शोध घेतला असता तो आनंद नगर परिसरात गुरुचरण हॉस्पीटल समोर चौकात त्याचे टाटा कंपनीचे इंडिगो कार सह मिळुन आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन अग्नीशस्त्र (गावठी पिस्टल), 05 जिवंत काडतुस, व एक इंडिगो कंपनीची कार असा एकुण 2,88,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपी विरुध्द पोलिस ठाणे कदिम जालना पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक स्थागुशा जालना, सहा. पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलिस अमंलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, विनायक कोकणे, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप, प्रशांत लोखंडे, संभाजी तनपुरे, सतिश श्रीवास, कैलास चेके, योगेश सहाने, धीरज भोसले सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.