बुलढाणा येथे दरोडा टाकणारी टोळी जालना स्थागुशा पथकाचे ताब्यात…
राजुरी स्टील कंपनीच्या मॅनेजरवर बुलढाणा जिल्हयामध्ये दरोडा टाकणारी टोळी जेरबंद करुन 05 आरोपींच्या ताब्यातुन ६ लक्ष रु,एक हयुंडाई व्हॅरना कार व मोबाईल असा एकुण रु.13,50,000/- किंमतीचा मुददेमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई….
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयातील जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर काही इसम संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्याने सदर इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलिस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यानुसार रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करुन कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 20/02/2024 रोजी 06:00 वाजता शासकीय
अभियांत्रिकी महाविदयालय, जालना समोरील रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची हयुडाई कंपनीची व्हॅरना कार मध्ये पाच इसम मिळुन आले. त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) कचरु श्रीकिसन पडुळ, वय-35 वर्ष, रा.मम्मादेवीनगर, नुतन वसाहत, जालना 2) बहादुर सुख्खुप्रसाद पासवान, वय-40 वर्ष, रा. चंदोली, ता.सखलदिया जि.चंदवली राज्य उत्तरप्रदेश ह.मु. राजुरी स्टील कंपनी, जालना 3) विष्णु गोविंद बनकर, वय 38 वर्ष, रा.दरेगांव, ता.जि.जालना 4) दारासिंग बाबुसिंग राजपुत, वय 46 वर्ष, रा. मोरांडी मोहल्ला, जुना जालना 5) सुनिल शिवाजी धोत्रे,
वय-30 वर्ष, रा. मदनेश्वरनगर, नेवासा, ता. नेवासा जि. अहमदनगर असे सांगीतले. तेव्हा त्यांचे वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये रु.6,00,000/- रोख रक्कम मिळुन आली. सदर पैशांबाबत विचारले असता त्यांनी समाधनकारक उतरे न देता उडवा उडवीची उतरे दिले. त्यामुळे त्यांची अंगझडती घेवून त्यांच्या ताब्यातील मोबाईल, कार व रोख रक्कमेची कागदपत्र हजर न केल्याने त्याचेवरचा संशय अधिक बळावल्याने आरोपीने बेनामी रोख रक्कम, मोबाईल व हयुडांई व्हॅरना कार कोठुन तरी चोरुन किंवा गैरमार्गाने मिळविलेली असल्याची शक्यता असल्याने त्यांचे विरुध्द चंदनझिरा पोलिस ठाणे येथे पोउपनि. राजेंद्र वाघ यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर वरील आरोपीकडे सखोल तपास केला असता त्यांनी दिनांक 14/02/2024 रोजी धोत्रा फाट्याजवळ, अंढेरा, बुलढाणा येथे अंढेरा पोलिस ठाणे हददीत राजुरी स्टील कंपनीचे मॅनेजरवर दरोडा टाकुन त्यांच्याजवळील रु.27,00,000/- रोख रक्कम जबरी चोरी केल्याची कबुली दिली व जप्त सहा लाख त्याच गुन्हयातील
असल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार माहिती घेतली असता बुलढाणा जिल्हयातील अंढेरा पोलिस ठाणे येथे गु.र.क्र.
49/2024 कलम 395 भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील तपासी अधिकारी यांना आरोपी व मुददेमालाबाबत माहिती देण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक स्थागुशा जालना, सहा. पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, सहा. पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, पोलिस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलिस शिपाई सॅम्युअल कांबळे, भाऊराव गायके, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, रमेश राठोड, सतिश श्रीवास, रुस्तुम जैवळ, आक्रुर धांडगे, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, संभाजी तनपुरे, विजय डिक्कर, योगेश सहाणे, धीरज भोसले, सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली