
स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गुटखा विक्री करणाऱ्याचा आवळल्या मुसक्या…
अवैधरित्या सुंगंधीत तंबाखु मिश्रीत गुटख्याची विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,त्याच्याकडुन रु. 4,84,080/- किंमतीचा मुददेमाल केला जप्त….
जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना शहरामध्ये काही इसम गुटखा व सुगंधित पान मसाला विक्री करीत असलेबाबत माहिती मिळाल्याने सदर इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस अधिक्षक श्री. अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यानुसार श्री. रामेश्वर खनाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार
करुन कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते


दिनांक 13/03/2024 रोजी गुटखा व सुगंधित पान मसाला बिक्री
करणाऱ्या राहुल सुदाम जाधव, वय 30 वर्ष, रा. कन्हैयानगर, जालना यास ताब्यात घेवुन त्याकडे चौकशी केली असता त्याने करडगांव वाडी शिवार, ता. घनसावंगी, जि. जालना येथे त्याचा मित्र नामे शेख इज्राईल शेख इस्माईल, रा. लालबाग जालना याच्या TATA ACE वाहन क्र.MH04FD0212 मध्ये ठेवलेला राजनिवास, गोवा गुटखा व हिरा पान मसाला असा एकुण रु.2,24,080/- किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत गुटखा व पान मसाला काढुन दिला. तसेच तो गुटखा त्याचे ओळखीचे

1) अतुल लक्ष्मीनारायण चौंडीये, वय 21 वर्ष, रा. नयाबाजार, जालना 2) सत्यम किशोर पराड, वय 22 वर्ष, रा. कन्हैयानगर, जालना यांच्या दत्तनगर, जालना

येथील गोडाऊनमधुन आणल्याचे सांगितले. त्यामुळे वरील
आरोपीविरुध्द फिर्यादी लक्ष्मीकांत गणेश आडेप यांच्या फिर्यादीवरुन घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन
आरोपी 1) राहुल सुदाम जाधव, वय 30 वर्ष, रा. कन्हैयानगर, जालना 2) अतुल लक्ष्मीनारायण चौडोये, वय 21 वर्ष,रा. नयाबाजार, जालना 3) सत्यम किशोर पराड, वय 22 वर्ष, रा. कन्हैयानगर, जालना यांना घनसावंगी पोलिस ठाण्यात मुददेमालासह हजर केले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल,अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांचे मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ,पोलिस निरीक्षक स्थागुशा जालना, सहा. पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, सहा.पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार विनायक कोकणे, लक्ष्मीकांत आडेप, गोपाल गोशिक,सतिश श्रीवास, कैलास चेके, सागर बाविस्कर सर्व स्था. गु. शा. जालना यांनी केली आहे.


