रात्र गस्ती दरम्यान सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री निकेतन कदम यांचा जुगारावर छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

लातुर – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे  की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्यानुसार  उपविभागीय पोलिस अधिकारी/  सहाय्यक पोलिस अधीक्षक,चाकुर निकेतन कदम जिल्ह्याच्या रात्र गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर लातूर शहरातील अवैध जूगारावर कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक 24/10/2023 रोजी काही इसम पैशावर तिर्रट जुगार खेळत आहेत अशी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर यांनी लातूर शहरातील कोल्हे नगर येथील अर्जित देशमुख यांच्या राहते घरी छापेमारी करून बेकायेशीररित्या जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने एकूण 11 इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 75 हजार 920 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिस ठाणे गांधी चौक मध्ये खालील नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चा कलम 4, 5 कायद्यान्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1) ज्ञानेश्वर दत्तात्रेय मोरे वय 22 वर्ष रा. श्रीकृष्ण नगर लातुर.





2) अविनाश लालासाहेब काळे वय 23 वर्ष रा. राजु नसार लातुर.



3) सुमित लक्ष्मण कांबळे वय 19 वर्ष रा. कोल्हे नगर लातुर.



4) दिपक मंगलसिंग खिच्चे,25 वर्ष वीर हनुमंतवाडी लातुर.

5) बिलाल एजाज शेख, वय 31 वर्ष रा.कातपुर रोड लातूर.

6) सचिन संजय गायकवाड 30 वर्ष आर टी ओ कार्यालया जवळ पाचपिर नगर लातुर.

7) मनोज रमेश कांबळे वय 29 वर्ष (रा. सिध्देश्वर चौक लातुर.

8) बलदेव रामलिंग बावरी वय 35 वर्ष रा. विरहनमंतवाडी लातूर.

9) अब्दुलरहीम महबु बागवान वय 30 वर्ष रा. बरकत नगर लातुर.

10) बबन कदम.

11) अर्जित देशमुख.

असे असून आरोपी क्रमांक 10 व 11 बबन कदम व अर्जित देशमुख यांनी त्याच्या घरात जुगार घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे आणि हे दोघे मिळून जुगार चालवीत होते.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 24/10/2023 रोजी पोलिस ठाणे गांधी चौक येथील कारवाईत पोलिस अधीक्षक .सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलिस अधिकारी/अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे. पुढील तपास गांधी चौक पोलिस करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!