ASP चंद्रकांत रेड्डी यांचा जुगारींना दणका,मध्यरात्री छापा टाकुन ७३ जुगारींना ताब्यात घेऊन २ कोटीचे वर मुद्देमाल केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सहा.पोलिस अधिक्षक चंद्रकांत रेड्डी यांचा जुगारींना दनका,पोलिस ठाणे औराद शहाजनी हद्दीत जुगारावर छापा टाकुन 74 जुगारींवर गुन्हा दाखल,2 कोटी 28 लाख 73 हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…..

लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर (अतिरिक्त पदभार निलंगा) बी.चंद्रकांत रेड्डी यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर दि (12) रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाणे औराद शहाजनी यांचे हद्दीतील मौजे तांबाळा शिवारातील एका शेतामध्ये चालणाऱ्या
परवानाधारक क्लबमधील जूगारावर छापा टाकुन कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक 12/05/2024 रोजी निलंगा तालुक्यातील पोलिस ठाणे औराद शहाजनी हद्दीमधील तांबाळा शिवारात शेतामध्ये मा. जिल्हाधिकारी लातूर यांनी घालून दिलेल्या परवान्यातील नियम व अटीचे उल्लंघन करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शेतात
परवानाधारक क्लबमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. अशी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर सहा. पोलिस अधिक्षक चाकूर  (अतिरिक्त पदभार निलंगा) यांनी छापेमारी केली असता तिथे तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने 74 इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 2 कोटी 28 लाख 73 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिस ठाणे औराद शहाजनी मध्ये नमूद 74 इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चा कलम 4, 5 व भारतीय दंड विधान कलम 188 या कायद्यान्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.





सदरची कानगिरी पोलिस अधीक्षक.सोमय मुंडे,अपर पोलिस अधिक्षक डॅा अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस अधिक्षक तथा  उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर (अतिरिक्त कार्यभार निलंगा) बी. चंद्रकांत रेड्डी यांचे नेतृत्वात पथकामधील पोलिस ठाणे औराद शहाजनी, व पोलिस ठाणे चाकूर येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी  केली आहे.
पुढील तपास औराद शहाजनी पोलिस करीत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!