
अहमदपुर व चाकुर उपविभागात दोन IPS अधिकाऱ्यांच्या धडाकेबाज कार्यवाह्यानी अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले….
अहमदपूर पोलिस स्टेशन हद्दीत वाळूची अवैध चोरटी वाहतूक करणारे 6 हायवा टिप्पर तसेच प्राण्यांची बेकायदेशीर रित्या कत्तलीकरीता वाहतुक करणारे एक वाहन ताब्यात घेऊन 18 व्यक्ती विरोधात तीन गुन्हे दाखल, 97 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त….
उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी व परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी पोलिस ठाणे अहमदपूर नवदीप अग्रवाल यांची धडाकेबाज कार्यवाही…


चाकुर/अहमदपुर(लातुर)प्रतिनिधी- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता पोलिस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी व परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी पोलिस ठाणे अहमदपूर नवदीप अग्रवाल यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर दिनांक 31/03/2024 रोजी पहाटे अहमदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोडवर सापळा लावून गौण खनिज वाळूची अवैध चोरटी वाहतूक करीत असलेल्या वाळूने भरलेल्या सहा हायवा टिप्पर एकूण 73 लाख 50 हजार रु च्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून त्यासंदर्भात पोलिस ठाणे अहमदपूर येथे विनापरवाना वाळूची चोरटी अवैध वाहतूक केल्याप्रकरणी खालील नमूद 13 आरोपीता विरुद्ध एकूण दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.1) लिबाजी शिवाजी कदम, वय 33 वर्षे रा. भेडेगाव ता लोहा जि नांदेड.2)ओमा वानखेडे रा. बेटसांगवी3) चंपती त्र्यंबक पवार, वय 35 वर्षे रा. भाद्रा ता. लोहा जि नांदेड.4) अरिफ शरीफ शेख, वय 24 वर्षे रा. कपीलेश्वर सांगवी ता. लोहा.5) शिवदास कदम रा. लोहा6) मारोती दत्ता कदम, वय 29 वर्षे रा. सेलगाव ता. लोहा जि. नांदेड.7) मालक नागनाथ मारोती मिटकर रा. सेलगांव 8.) मिनाज मेहताब शेख, वय 24 वर्षे रा. काजळ हिप्परगा ता अहमदपूर9) मालक सखाराम राजगीर रा. अहमदपुर10) राजाभाऊ हरीभाऊ वानखेडे वय 29 वर्षे रा. कपलेश्वर सांगवी ता लोहा जि नांदेड11) मालक वैजनाथ लुट्टे रा शिवली बाजीराव ता लोहा जि नांदेड.12). शाहरुख मौलानी सय्यद वय 26 वर्षे रा. बामाजीचीवाडी ता. उदगीर13)अजय मधुकर गुरुडे रा. हेर

नमूद सर्व आरोपी विरुद्ध पोलिस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दुसर्या कार्यवाहीत सहाय्यक पोलिस अधीक्षक रेड्डी व परीविक्षाधिन पोलिस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी पोलिस ठाणे अहमदपूर नवदीप अग्रवाल यांनी आणखीन एक कारवाई करत पोलिस ठाणे अहमदपूर हद्दीमधून गोवंशीय बैलांची अवैध वाहतूक करीत असलेल्या आयशर टेम्पोला ताब्यात घेऊन 17 बैल व वाहनासह 23 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस ठाणे अहमदपूर येथे प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 च्या विविध कलमान्वये आरोपी नामे 1)मोहसीन ईकबाल शेख, वय 28 वर्षे रा. खाजा नगर,सावदा ता. रावेर जि. जळगांव 2) सईद ईसाक शेख, वय 45 वर्षे व्यवसाय मजुरी रा. बगारी ता. जामनेर जि. जळगांव 3) अखील खलील शेख, वय 27 वर्षे रा. वगारी ता. जामनेर जि. जळगांव 4) सुपडु सेठ रा. जळगाव 5) मोहम्मद रफीक रा. जाहीराबाद राज्य तेलंगना
यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.

सदरच्या दोन्ही कार्यवाही पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर व परिक्षाधीन पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल उत्कृष्ट कारवाई करत एकाच रात्रीतून अवैधरित्या चोरटी वाहतूक करणारे सहा हायवा व प्राण्याची अवैध वाहतूक करणारे वाहनाला गोवंशीय बैलांसह एकूण 97 लाख रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन विविध कलमान्वये तीन गुन्हे दाखल केले आहेत.


