बनावट गुटखा कारखान्यावर लातुर पोलिसांचा छापा,३ करोड रु चा मुद्देमाल केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

लातूर पोलिसांचा बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा, ३ कोटींचा गुटखा व मुद्देमाल जप्त….





लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशानुसार लातूर पोलिस दलाकडून अवैद्य धंद्याविरुद्ध लातूर शहर व जिल्ह्यात कडक मोहीम राबविण्यात येत आहे. अवैद्य धंद्याविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या कडक कारवाईचाच भाग म्हणून सहाय्यक पोलिस अधिक्षक  बी चंद्रकांत रेड्डी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस आधिकारी, चाकूर यांच्या पथकाला अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथे अवैद्यरीत्या बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळाली.



मिळालेल्या माहितीची खात्री करून सहा पोलिस अधिक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने दिनांक २८ मे रोजी लातूर येथील अतिरिक्त एमआयडीसी मधील कोंबडे ऍग्रो एजन्सी या वेअर हाऊस वर छापा टाकला. छाप्यामध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सुपारी, तंबाखू पावडर, मिक्सर, सिलिंग करणाऱ्या मशीन, गोवा 1000 असे छापील पॅकिंग साहित्य, बनावट गुटखा, एक ट्रक व एक पिक अप असा एकूण 03,05,73,400/- रुपये (तीन कोटी पाच लाख त्र्याहत्तर हजार चारशे रुपये) किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.



सदर प्रकरणी आरोपी  १) अंकुश रामकिशन कदम, वय 32 वर्षे रा रामवाडी ता चाकूर २) हसनकुमार तिलाही उराम व 21 वर्षे राहणार शाहबगंज राज्य बिहार, ३) गोकुळ धनराम मेघवाल रा चुवा, राज्य राजस्थान, ४) धनंजय गहिनीनाथ कोंबडे, रा. लातूर, ५) पारस बालचंद पोखरणा, रा लातूर, ६) राम केंद्रे, रा. लातूर व ७) विजय केंद्रे, रा लातूर यांचे विरुद्ध MIDC पोलिस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधीक्षक  बी चंद्रकांत रेड्डी, पोलिस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, पोलिस उपनिरीक्षक  राजेश घाडगे, पोहवा विष्णू गुंडरे, नापोशि अनंतवाड, पोशि कांबळे, धडे, गाडेकर, शिंदे, पेद्देवाड, रायबोळे यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!