पिस्टल,काडतुससह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

१ पिस्टल, २ जिवंत काडतुस व मॅग्झीनसह आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखा लातूर च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे एका इसमांकडून ०१, पिस्टल ०२ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून शस्त्र जप्तीची ही दुसरी कारवाई आहे.





स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि (16) रोजी औसा तुळजापूर जाणाऱ्या रोडवर चिंचोली येथे पाण्याच्या टाकीजवळ थांबलेल्या एका इसमास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेऊन चौकशी केली असता  महेश दिनकर कुलकर्णी, वय 30 वर्ष, रा टाका ता औसा जि लातूर याच्या ताब्यातून ०१ पिस्टलसह, ०२ जिवंत काडतुसे व मॅग्झीन हस्तगत करण्यात आले आहे. सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय रामराव भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे भादा येथे गुरनं 128/2024 कलम 3 (1) 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास भादा पोलिस स्टेशन कडून करण्यात येत आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय उत्कृष्टरित्या गोपनीय माहितीचे संकलन व विश्लेषण करून करून 1 पिस्टल, 2 राउंड व मॅग्झीन बाळगणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे.



सदर आरोपी महेश दिनकर कुलकर्णी हा सध्या पुणे येथे वास्तव्यास असून पो.स्टे.सिंहगड रोड पुणे गु.र.नं. 05/2015 कलम 302 भादवि सह 4/25 शस्त्र अधिनियम मधील आरोपी असून त्यामध्ये त्यास जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सध्या तो जामिनावर बाहेर असल्याने त्याच्या मूळ गावी आला होता.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधिक्षक, अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थागुशा संजिवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलिस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलिस अंमलदार रामहरी भोसले, प्रकाश भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!