लुटीचा डाव करणार्या सराफा व्यापार्यास स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने घेतले ताब्यात,लुटीचा डाव उधळला…
जबरी चोरीचा बनाव करुन डोळ्यात मिरची पूड टाकून 26 तोळे सोन्याचे दागिने लुटीचा डाव करणाऱ्या सराफा व्यापाऱ्यास शिताफीने ताब्यात घेऊन, स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे लातूर ग्रामीण यांनी केला गुन्हा उघड…,
लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 23 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी सात वाजण्याचे सुमारास लातूर येथील सराफा व्यापारी अमर अंबादास साळुंके, वय 31 वर्ष, रा. पोचम्मा गल्ली ,लातूर यांनी पोलिस ठाणे लातूर ग्रामीण येथे तक्रार केली की, दि 23 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी सराफ लाईन, लातूर येथील एका दुकानातून 20 लाख 46 हजार रुपये किमतीचे 26 तोळे सोन्याचे दागिने त्याचे स्कुटी गाडीच्या डिक्की मध्ये घेऊन नेहमीप्रमाणे ग्राहकांना दाखविण्यासाठी रेनापुर येथे गेलो होतो. तेथून परत येत असताना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रेनापुर ते लातूर जाणारे रोडवरील कातळे नगर,जवळ मोटर सायकल वरून आलेल्या दोन अज्ञान व्यक्तीने माझ्या डोळ्यात मिरची पूड टाकून माझ्या गाडीतील 26 तोळे सोन्याचे दागिने चोरून घेऊन पळून गेले अशी तक्रार दिली
सदर तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांचे सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण बि.चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे लातूर ग्रामीणचे अधिकारी अंमलदारांचे पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन करून तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. सदर पथकांनी तात्काळ घटनास्थळावर पोहोचून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तसेच तक्रारदार अमर अंबादास साळुंके याचे कडे कुशलतेने विचारपूस केली. घडलेली घटना व अमर साळुंके सांगत असलेल्या हकीकत मध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येत होत्या.
त्यावरून पथकाने अमर साळुंके यास विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितले की, मला लोकांचे पैसे देणे असल्याने सदरचे दागिने चोरी गेल्याचा बनाव करून त्यामधून माझा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी चोरीचा बनाव केल्याचे कबूल केले. तसेच त्याने रेणापूर ते लातूर कडे येणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतामध्ये खड्डा करून लपवून ठेवलेले 20 लाख 46 हजार रुपयांचे 26 तोळ्याचे दागिने काढून दिल्याने ते पोलिसांनी हस्तगत केले आहे.तसेच डोळ्यात मिरची पूड घालून सोन्याचे दागिने लुटीचा बनाव करून पोलिसांना खोटी तक्रार दिल्याच्या कारणावरून अमर अंबादास साळुंके,वय 31 वर्ष, (सोने चांदीचे व्यापारी) रा. पोचमा गल्ली, लातूर याचे विरुद्ध पोलिस ठाणे लातूर ग्रामीणचे ठाणे अंमलदार लक्ष्मण धर्माजी कुंभरे त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.वरीष्ठांचे मार्गदर्शनात पथकांनी अतिशय कुशलतेने सदर घटनेचा तपास करून सदरची घटना ही खोटी असून बनवाबनवी केल्याचे निष्पन्न करून तक्रारदारा कडूनच 20 लाख 46 हजार रुपयांचे 26 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक सोमय मुंडे,अपर पोलिस अधिक्षक डॅा अजय देवरे, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी,चाकूर चार्ज लातूर ग्रामीण बी. चंद्रकांत रेड्डी यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड ,पोलिस अंमलदार मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी,नितीन कठारे, मनोज खोसे, सचिन मुंडे, तसेच पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार ,पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस अंमलदार चौगुले, चंद्रपाटले, दरोडे यांनी केली आहे.