
गर्दीमध्ये गळ्यातील सोन्याच्या साखळ्या चोरणाऱ्यास बीड मधून केली अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील सोन्याच्या साखळ्या/ लॉकेट चोरणाऱ्या सराईत आरोपीला बीड मधून अटक.,33 ग्राम वजनाचा 2 लाख रुपये किमतीचा लॉकेट जप्त. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी….
लातुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलिस अधिकारी/अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती त्यानुसार
पोलिस ठाणे मुरुड येथे मनोज जरांगे यांचे सभेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील लॉकेट चोरीची घटना घडली होती त्यावरून पोलिस ठाणे मुरुड येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे लॉकेटसह आरोपीला तेलगाव चौक, बीड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव


1) उमेश सत्यवान टल्ले, वय 33 वर्ष राहणार नूर कॉलनी, बीड.
असे असल्याचे सांगितले. नमूद आरोपीला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, त्याने मुरुड येथील श्री मनोज जरांगे यांचे सभेमधील एकाच्या गळ्यातून गर्दीचा फायदा घेऊन, चोरल्याचे कबूल केले. नमूद आरोपीने वर गुन्ह्यात चोरलेला सोन्याचे 33 ग्रॅम वजनाचा 2 लाख रुपये किमतीचा सोन्याचा लॉकेट जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजू भोसले,पोलिस अमलदार रियाज सौदागर, योगेश गायकवाड, रामहरी भोसले, प्रदीप स्वामी, यांनी केली आहे.



