लातुरात ९ लक्ष रुपये किंमतीची गांजा जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

लातुर – सवीस्तर व्रुत्त असे की ,पोलिस अधीक्षक  सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने लातूर पोलिसा कडून अवैध धंद्यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत होती त्यानुसार
दरम्यान पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखा लातूर व दहशतवाद विरोधी शाखा, लातूर च्या संयुक्त पथकाने दिनांक 24/10/2023 रोजी मध्यरात्री गांजाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करीत असलेल्या कार क्रमांक एम एच 24 एडब्ल्यू 9340 कारला गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करून नवीन रेनापुर नाका परिसरात ताब्यात घेऊन कार मधील लोकांना विचारपूस करून कारची झडती घेतली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या खाताच्या पोत्यात गाडीच्या डिग्गी मध्ये लपून ठेवलेले 3.215 किलोग्राम प्रतिबंधित बी मिश्रित गांजा जप्त करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा,लातूर यांनी पाठलाग करून ताब्यात घेतलेल्या कार मध्ये प्रतिबंधित गांजा आढळून आल्याने तो कारसह जप्त करण्यात आला असून पोलीस ठाणे, विवेकानंद चौक येथे गुन्ह्यातील आरोपी नामे

1) शरीफ लतीफ शेख, वय 35 वर्ष, राहणार कॉईल नगर, लातूर.





2) वसीम बाबूलाल अत्तार, वय 26 वर्ष, राहणार बस स्टॅन्ड जवळ धर्मापुरी तालुका परळी जिल्हा बीड



3) ईश्वर नवनाथ फड, राहणार धर्मापुरी तालुका परळी (फरार)



यांचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 637/2023 कलम 8 (क), 20 (ब) 29 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act ) 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून चोरटी विक्री व्यवसायासाठी बी मिश्रित गांजा, वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली कार व इतर साहित्य असा एकूण 9 लाख 31 हजार 825 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास विवेकानंद चौक पोलिस स्टेशनचे  करीत आहेत.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 24/10/2023 रोजी पोलिस अधीक्षक .सोमय मुंडे,अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा यांच्या संयुक्त पथकातील पोलिस सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलिस उपनिरीक्षक आयुब शेख, सहाय्यक फौजदार उत्तम जाधव, अंगद कोतवाड, पोलीस अमलदार संपत फड, मोहन सुरवसे, नाना भोंग, सचिन धारेकर, सचिन मुंडे, नकुल पाटील, संजय काळे, चंद्रकांत केंद्रे, राहुल सोनकांबळे,पोलिस फोटोग्राफर सुहास जाधव, धनंजय गुट्टे यांनी सदरची कामगिरी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!