
बहुचर्चित खुनाचा उलगडा करण्यात लातुर पोलिसांना यश,हैद्राबाद येथुन आरोपीस केली अटक…
बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपीला हैदराबाद येथुन स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक,विवेकानंद चौक पोलिस स्टेशनसह संयुक्तरित्या केली कारवाई….
लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्त व्रुत्त असे की, पोलिस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतील ताजुद्दिन बाबा नगर, लातूर परिसरात दिनांक 06/01/ 2024 रोजी मध्यरात्री कुणीतरी अज्ञात आरोपीने दर्गा परिसरात झोपलेला फारुख उर्फ मुकड्या सुजातली सय्यद याचा अज्ञात कारणासाठी तिष्ण हत्याराने, डोक्यात,गळ्यावर, हातावर मारहाण करून खून केल्याची घटना घडली होती.
त्यावरून पोलिस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 12/ 2024 कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास विवेकानंद पोलिस करीत होते.
सदर गुन्ह्यातील मयत हा सराईत व रेकॉर्ड वरील गुन्हेगार होता. विविध पोलिस ठाण्याला संबंधित मयतावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच तो गुंड प्रवृत्तीचा असल्याने अनेकांशी त्याचे शत्रुत्व होते. त्यामुळे त्याचा खून नेमका कोणी व कशामुळे केला यासंदर्भात मोठ्या प्रमाणात संभ्रम होता. तसेच परिसरातील नागरिकाकडून गुन्ह्याच्या तपासात काही एक उपयुक्त माहिती मिळत नव्हती.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्याचा उलगडा करून गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन व सूचना करीत होते. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले व विवेकानंद चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलिस ठाणे विवेकानंद चे संयुक्त पथक तयार करून गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात येत होता.
दरम्यान पथकाकडून रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करण्यात येत होती.
सदर पथकाला मिळालेल्या गोपनीय व सायबर सेल कडून मिळालेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी हा हैदराबाद येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून संयुक्त पथकातील पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे, पोलिस अंमलदार रियाज सौदागर, योगेश गायकवाड व आनंद हल्लाळे यांचे पथक तात्काळ तेलंगाना राज्यातील हैदराबाद येथे रवाना होऊन हैदराबाद मधील बोराबंडा परिसरात सापळा लावून अतिशय शिताफिने नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपीला दिनांक 11/01/2024 रोजी ताब्यात घेऊन पोलिस ठाणे विवेकानंद चौक येथे आणले. पोलिस ठाणे विवेकानंद चौक येथे आणून सदर संशयित आरोपीला विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव


समीर उर्फ जालीम अखिल शेख, वय 24,वर्ष राहणार ,साळे गल्ली,बौद्ध नगर, लातूर.
असे असून रात्री झोपलेल्या फारुख उर्फ मुकड्याच्या खूनाच्या कारणाची विचारपूस केली असता नमूद मयत खर्चासाठी वारंवार पैशाची मागणी करीत होता. समीर याने मयताला अनेक वेळा पैसेही दिले. परंतु नमूद मयत समीर कडे रोजच पैशाची मागणी करू लागला होता. पैसे न दिल्यास तो समीरला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत होता. याला कंटाळून समीरने रात्रीच्या वेळी उघड्यावर झोपलेल्या फारूक उर्फ मुकड्या याच्या डोक्यात फरशी घालून व नंतर गळ्यावर चाकूने मारून खून केल्याचे सांगितले.
समीर उर्फ जालीम अखिल शेख याला पोलीस ठाणे विवेकानंद येथे दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून समीर याचे विरुद्ध याआधी पण पोलिस ठाणे गांधी चौक येथे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस ठाणे विवेकानंद चौक चे सहाय्यक पोलिस निरीक्षक नाना लिंगे व पोलिस अंमलदार वाजिद चिखले हे करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, विवेकानंद चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वातील संयुक्त पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक पल्लेवाड, नाना लिंगे, घारगे पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे, केंद्रे ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार रियाज सौदागर,योगेश गायकवाड, राजेश कंचे,पोलिस ठाणे विवेकानंद चे पोलिस अमलदार आनंद हल्लाळे, रमेश नामदास, वाजिद चिखले, सायबर सेलचे पोलिस अमलदार गणेश साठे,शैलेश सुडे यांनी केली आहे.



