पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने परीविक्षाधीन उपअधिक्षक अंकीता कणसे यांनी बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखाण्यावर छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

लातुर –  सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक अंकिता कणसे यांच्या पथकाने औराद शहाजनी येथे बनावट गुटखा कारखान्यावर छापा टाकला. येथून पोलिसांनी 1 लाख 94 हजारांचा बनावट गुटखा व कच्चा माल ,साहित्य जप्त केले. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली .
पोलिस अधीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली की, औराद शहाजनी येथे अवैधरित्या, मानवी शरीरास अपायकारक बनावट गुटखा तयार करून त्याची पॅकिंग करून विक्री करत आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीची शहनिशा व खात्री करून परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक अंकिता कणसे यांनी पथकासह महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर पोलीस ठाणे औरद शहाजणी हद्दीत दुर्गम भागात झाडीमध्ये तयार केलेल्या एका पत्राचे शेड मध्ये चालू असलेल्या बनावट गुटखा कारखान्यावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अडीच किलोमीटर पायी चालत जाऊन धाड टाकली त्यामध्ये गुटखा पॅकिंग करण्याची मशीन, वेगवेगळ्या प्रकारचे कच्चे मटेरियल तसेच बनावट तयार केलेला विमल पान मसालाच्या गोन्या इत्यादी साहित्य असे 1,94,566/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी

1) श्रीनिवास गणपतराव शिवणे, वय 27, वर्षे , राहणार औराद शहाजनी,तालुका निलंगा.





2) अभिषेक कालिदास बिराजदार, वय 24 वर्षे, राहणार औराद शहाजनी, तालुका निलंगा.



यांचे विरुद्ध पोलिस स्टेशन औराद शहाजनी येथे गुरन. 240/2023 कलम – 188, 272, 273, 328, 34 भादवी व अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 59 अन्वये गून्हा दाखल करण्यात आला आहे.



पोलिसांनी छापा टाकला त्या ठिकाणी बनावट गुटखा , सुगंधित तंबाखू , गुटखा बनवण्याची मशीन , सुपारी , मॅग्निशियम पावडर , कत्था पावडर , विमल पानमसाला व खाली रॅपर्स , गुटखा लेबलिंग पॅकिंग उपयोगी इतर साहित्य असे 1 लाख 94 हजारांचा बनावट गुटख्यासह मुद्देमाल जप्त केला .
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अंकिता कणसे यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार अनिल जगदाळे, राहुल दरोडे, सचिन चंद्रपाटले, बाळू कांडनगिरे, चालक चव्हाण तसेच पोलीस स्टेशन निलंगा येथील पोलीस अमलदार बालाजी सोमवंशी, जीवने यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!