
वाळुच्या अवैधरित्या साठविलेल्या साठ्यांवर परीविक्षाधिन पोलिस अधिक्षकांचा छापा,९० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
बेकायदेशीर वाळूच्या साठ्यांवर परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक नवदिप अग्रवाल यांचा छापा…..
अहमदपुर(लातुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल हे गेल्या काही दिवसांपासून अवैध उत्खनन, मोठ्या प्रमाणात वाळू तस्करीचा पाठपुरावा करत होते.
त्यांना मिळालेल्या माहितीच्या तपासात मध्यरात्री व पहाटे वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे त्यांनी सापळा रचून वाळूने भरलेले एकूण 6 टिप्पर जप्त केले. 31/03/2024 रोजी दोन गुन्हे दाखल केले. तसेच काही दिवसांपूर्वी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी वाळूने भरलेले 3 ट्रक जप्त करून वेगवेगळ्या कारवाईत गुन्हा दाखल केला होता.
वारंवार होत असलेल्या अवैध वाळू वाहतुकीबाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी आणि परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी या अवैध वाळू वाहतुकीशी संबंधित घटनेचा अतिशय बारकाईने व कसून तपास केला व त्याचा शोध घेतला. बेकायदेशीररीत्या वाळूची साठवणूक केल्यानंतर ती रात्री टिप्परमध्ये भरून इतर ठिकाणी पाठवून विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. नवदीप अग्रवाल यांनी महसूल विभागासह एकत्रित पथक तयार करून सांगवी फाटाजवळील वाळूचा मोठा साठा असलेला वाळू डेपो सील केला. सुमारे 135 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.अशाप्रकारे आठवडाभरात 9 टिप्परसह 90 लाख रुपयांची वाळू जप्त करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील अवैध वाळूसाठा व वाहतुकीसंदर्भात ही मोठी कारवाई असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.




