अंबड येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अंबड पोलिस ठाणे येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या…

नाशिक – (शहर प्रतिनिधी ) अंबड पोलिस ठाण्याच्या दुय्यम पोलिस निरीक्षकांनी पोलीस ठाण्यामध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक नजन असे दुय्यम पोलिस निरीक्षकाचे नाव असून या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.





याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली असून अंबड पोलिस ठाण्यातील त्यांच्या कॅबिनमध्ये नजन यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. त्यामुळे यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गेल्या वर्षभरापासून अंबड पोलिस ठाण्याचे दुय्यम पोलिस निरीक्षक म्हणून अशोक नजन काम करत होते. अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचे असलेले नजन यांनी आपल्या कामातून वचक निर्माण केला होता.



आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ते त्यांच्या कॅबिनमध्ये बसलेले होते. तेव्हा त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. या मध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अंबड पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर अशोक नजन यांनी स्वतःवर का गोळी झाडली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!