महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदी वरीष्ठ भापोसे अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती…
काल मुख्य सचिव कार्यालयात प्राप्त आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली केली होती. त्यानंतर, आता राज्याच्या नव्या पोलिस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे,रश्मी शुक्लांना हटवल्यानंतर राज्याचं पोलिस दल हे वरीष्ठ IPS अधिकाऱ्याच्या हाती देण्यात आलय
मुंबई(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली केली होती. त्यानंतर, आता राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय वर्मा हे १९९० च्या तुकडीचे वरिष्ठ अधिकारी असून सध्या कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते. ते एप्रिल २०२८ मध्ये निवृत्त होणार आहेत.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्यात यावी. त्यांच्याकडील कार्यभार सेवाज्येष्ठतेनुसार त्यांच्यानंतरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे (मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर) देण्यात यावा. तसेच, मुख्य सचिवांनी सेवाज्येष्ठता व योग्यतेनुसार तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी नावे मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडे पाठवावीत, यापैकी एका अधिकाऱ्याची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली जाईल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार, वर्मा यांची महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.