घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त…
घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त..
पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरी आणि वाईन शॉपमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ५ दुचाकी जप्त करुन 3 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विरेंद्र कुमार मिस्त्रीलाल (वय-२३वर्षे सध्या रा.फिरस्ता मुळ, रा.चमंधा, कासिया कौशाम्बी, भरवारी, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
भोसरी परिसरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढच होत होती. म्हणुन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी भोसरी पोलिस ठाण्यात विशेष पथक तयार करण्यात आले होते. पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोरीची घटना घडलेल्या ठिकाणांना भेटी देऊन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून त्या ठिकाणी मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी निष्पन्न केला. तपास पथकाने २६ डिसेंबर रोजी आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.
या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.२६डिसेंबर) रोजी शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस ठाणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सपोनि कल्याण घाडगे, पोलिस उप निरीक्षक मुकेश मोहारे, पोलीस अंमलदार सचिन सातपुते, तुषार वराडे, सागर जाधव यांनी मोटारसायकल चोरट्यांचे सीसीटिव्ही फुटेज तसेच मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी नामे विरेंद्र कुमार मिस्त्रीलाल वय २३ वर्षे रा.सध्या फिरस्ता, मुळ पत्ता चमंधा, कसिया कौशाम्बी, भरवारी, उत्तरप्रदेश यास घावडेवस्ती भोसरी येथून सापळा लावुन ताब्यात घेतले.
सदर आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने भोसरी व चिंचवड येथून चोरी केलेल्या ०५ मोटारसायकल काढून दिलेल्या असून त्या गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच त्याने पूर्वी तो काम करीत असलेल्या भोसरी येथील एका वाईनशॉपमध्ये दोन वेळा चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत तपास चालू आहे.
भोसरी पोलिस ठाणेकडील तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय शिताफीने व कौशल्यपूर्ण तपास करून अटक आरोपी नामे विरेंद्र कुमार मिस्त्रीलाल वय २३ वर्षे रा. सध्या फिरस्ता, मुळ पत्ता- चमंधा, कसिया कौशाम्बी, भरवारी, उत्तरप्रदेश याचेकडून एकूण ०५ चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करून मोटारसायकल चोरीचे एकूण ०५ गुन्हे तसेच त्याने पुर्वी काम करीत असलेल्या उमेश वाईन्स, भोसरी या दुकानात चोरी केलेले ०२ घरफोडीचे गुन्हे असे एकूण ०७ गुन्हे उघडकीस आणून रूपये ३,१८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, विनयकुमार चौबे, सह.पोलिस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त, वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परि.१, विवेक पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग, विठ्ठल कुबडे यांच्या सुचना व प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजी गवारे, सपोनि कल्याण घाडगे, पोउपनि मुकेश मोहारे, पोलिस हवालदार हेमंत खरात, डी बी केंद्रे, मपोहवा. मुळे, पोना नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, पोलिस अंमलदार सचिन सातपुते, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे, मपोहवा. भाग्यश्री जमदाडे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.