
ठाणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, 100 जण ताब्यात
ठाणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, 100 जण ताब्यात
ठाणे – नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. घोडबंदर भागात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे पोलिसांनी रविवारी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थ जप्त केले असून जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले आहे.


घोडबंदर येथे एक रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या पार्टीमध्ये विविध अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाड टाकून ही पार्टी उधळली असून 100 तरुणांना ताब्यात घेतले आहे. या मध्ये पोलिसांनी गांजा, चरस, एमडी हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. मध्यरात्री युनिट पाचचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पार्टी सुरू असतांना पथकाने धाड टाकली. या रेव्ह पार्टीत अनेक तरुण हे मद्यधुंद आणि नशेत असल्याचे आढळले. ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्याकडून संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांना पोलिसांनी पंचनामा करून वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.



