राज्यातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या पदन्नोतीने बदल्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

राज्यातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या पदन्नोतीने बदल्या…

पुणे (प्रतिक भोसले) – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी आज बुधवार (दि.31) रोजी काढले आहेत.





अधिकाऱ्यांच्या पदन्नोतीने बदल्या पुढीलप्रमाणे –



१) रितेश कुमार (पोलीस आयुक्त पुणे ते महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई – पदोन्नती)



२) अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, नागपूर शहर ते पोलीस आयुक्त, पुणे शहर)

३) प्रभात कुमार (अपर पोलीस महासंचालक व उप महासमादेशक, होमगार्ड, मुंबई ते संचालक नागरी संरक्षण, मुंबई (अपर पोलीस महासंचालक श्रेणीत पद अवनत करुन)

४) रविंद्र कुमार सिंगल (अपर पोलीस महासंचालक, वाहतूक, मुंबई ते पोलीस आयुक्त नागपूर शहर)

५) शिरीश जैन (सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई ते आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई (पदोन्नतीने)

६) दीपक पांडे (विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभाग, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग,मुंबई (पदोन्नतीने पद उन्नत करुन)

७) दत्तात्रय कराळे (पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर ते विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र)

८) संजय शिंदे (पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड ते विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

९) प्रवीण पवार (विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई ते पोलीस सह आयुक्त, पुणे शहर)

१०) प्रवीणकुमार पडवळ (पोलीस सह आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई)

११) संजय दराडे (विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई)

१२) ज्ञानेश्वर चव्हाण (विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र ते पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर)

१३) एस.डी. एनपुरे (विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई ते पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई)

१४) एन.डी. रेड्डी (पोलीस आयुक्त अमरावती शहर ते पोलीस आयुक्त, अमरावती शहर (पदोन्नतीने पद उन्नत करुन)

१५) संदीप पाटील (पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र ते विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षल विरोधी अभियान, नागपूर (पदोन्नतीने)

१६) विरेंद्र मिश्रा (अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र (पदोन्नतीने)

१७) रंजन कुमार शर्मा (अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, पुणे शहर ते विशेष पोलीस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

१८) नामदेव चव्हाण (पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते विशेष पोलीस महानिरीक्षक, रा.रा. पोलीस बल, नागपूर (पदोन्नतीने)

१९) राजेंद्र माने (पोलीस आयुक्त, सोलापूर शहर ते सह संचालक, महाराष्ट्र अकादमी, नाशिक)

२०) विनिता साहु (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र. ५, दौंड, पुणे ते अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई (पदोन्नतीने)

२१) एम. राजकुमार (पोलीस अधीक्षक, जळगाव ते पोलीस आयुक्त, सोलापूर शहर (पदोन्नतीने)

२२) अंकित गोयल (पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण ते पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र (पदोन्नतीने)

२३) बसवराज तेली (पोलीस अधीक्षक, सांगली ते पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे (पदोन्नतीने)

२४) शैलेश बलकवडे (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१ पुणे ते अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर (पदोन्नतीने)

२५) शहाजी उमाप (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण ते अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई (पदोन्नतीने)

२६) एस.जी. दिवाण (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१६ कोल्हापूर ते पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान, पुणे (पदोन्नतीने)

२७) संजय शिंत्रे (पोलीस अधीक्षक, सायबर, मुंबई ते पोलीस उप महानिरीक्षक, दक्षता, वस्तु व सेवा कर विभाग, मुंबई (पदोन्नतीने)

२८) मनोज पाटील (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई ते अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, पुणे शहर (पदोन्नतीने)

२९) विक्रम देशमाने (पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण ते पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)

३०) पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)

३१) एम.सी.व्ही. माहेश्वरी रेड्डी (पोलीस उपायुक्त, मुख्यालय -१, बृहन्मुंबई ते पोलीस अधीक्षक, जळगाव)

३२) अजय कुमार बन्सल (पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ते पोलीस अधीक्षक जालना)

३३) रविंद्रसिंह परदेशी (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर ते पोलीस अधीक्षक, परभणी)

३४) रागसुधा आर. (पोलीस अधीक्षक, परभणी ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई)

३५) संदीप घुगे (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, सांगली)

३६) मुमक्का सुदर्शन ( पोलीस उपायुक्त, नागपूर शहर ते पोलीस अधीक्षक, चंद्रपूर)

३७) धोंडोपंत स्वामी (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई ते पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण)

३८) पंकज कुमावत (पदस्थापनेच्य प्रतिक्षेत ते अपर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण)

३९) मितेष घट्टे (अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई)

४०) विक्रम साळी (अपर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण ते सहायक पोलीस महानिरीक्षक, नियोजन व समन्वय, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय मुंबई)

४१) आनंद भोईटे (अपर पोलीस अधीक्षक, बारामती ग्रामीण ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई)

४२) संदीप पखाले (अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण ते पोलीस अधीक्षक, विशेष कृती गट, नक्षलवाद विरोधी अभियान, नागपूर)

४३) रमेश धुमाळ (सहायक पोलीस महानिरीक्षक, नियोजन व समन्वय, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय मुंबई ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई)

४४) समाधान पवार (सह आयुक्त (दक्षता) अन्न व औषध प्रशासन, मुंबई ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई)

या मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक बी.जी. शेखर यांची या पदावरुन बदली करण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढले जातील.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!