
राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या…
राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या…
मुंबई (प्रतिक भोसले) – गृहखात्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भापोसे/रापोसे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव स्वप्निल बोरसे आणि कार्यासन अधिकारी मृणाल सावंत यांनी काल सोमवार (दि.५) रोजी काढले आहेत.


पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे –

१) संदीप बाबुराव मिटके – (सहायक पोलिस आयुक्त नाशिक शहर ते पोलिस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर)

२) संजय रतन बांबळे – (पोलिस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर ते पोलिस उप अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)
३) पुंडलिक नामदेवराव भाटकर – (पोलिस उप अधीक्षक मुख्यालय, नागपूर ग्रामीण ते पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण)
४) गणेश प्रवीण इंगळे (उपविभागीय पोलिस अधिकारी, नांदेड ग्रामीण उपविभाग ते सहायक पोलिस आयुक्त पुणे शहर)
५) रमेश तुकाराम बरकते – (उपविभागीय पोलिस अधिकारी, चांदुर रेल्वे उपविभाग अमरावती ग्रामीण ते उपविभागीय पोलिस अधिकारी, रामटेक उपविभाग नागपूर ग्रामीण)
६) राहुल रामचंद्र झाल्टे – (उपविभागीय पोलिस अधिकारी, पालघर उप विभाग ते उपविभागीय पोलिस अधिकारी गणेशपूरी, उप विभाग ठाणे ग्रामीण)
७) अजय विलासराव कोकाटे – ( उपविभागीय पोलिस अधिकारी जिमलगट्टा उपविभाग, जि.गडचिरोली ते उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी उपविभाग जि.गडचिरोली)
८) वैशाली उत्तमराव माने – ( पोलिस उप आयुक्त अमरावती शहर ते पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे)
९) राजीव धुराजी नवले – (उपविभागीय पोलिस अधिकारी, गडहिंग्लज उप विभाग, जि.कोल्हापूर ते सहायक पोलिस आयुक्त नाशिक शहर)
१०) रामदास जयसिंग इंगवले – (उप विभागीय पोलीस अधिकारी औसा, उप विभाग, जि.लातूर ते उपविभागीय पोलिस अधिकारी, गडहिंग्लज उप विभाग, जि.कोल्हापूर)
११) अनिल तुकाराम घेरडीकर – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते सहायक पोलिस आयुक्त ठाणे शहर)
१२) गणपत दिनकर पिंगळे – (पोलिस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलढाणा ते उपविभागीय पोलिस अधिकारी, जव्हार उप विभाग जि.पालघर)
१३) धुळा ज्ञानेश्वर टेळे – ( सहायक पोलिस आयुक्त नवी मुंबई ते उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत उप विभाग, जि.रायगड)
१४) विजय पांडुरंग लगारे – ( उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत उप विभाग, जि.रायगड ते उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेड ग्रामीण उप विभाग)
१५) अजयकुमार सूर्यकांत लांडगे – (पोलिस उप अधीक्षक, विशेष कृती दल नक्षल विरोधी अभियान, नागपूर ते सहायक पोलिस आयुक्त नवी मुंबई)
१६) राधिका सुनील फडके – ( पोलीस उप अधीक्षक मुख्यालय चंद्रपूर ते पोलीस उप अधीक्षक मुख्यालय रत्नागिरी)
१७) कैलास सोपान जयकर – (उप प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला ते पोलीस उप अधीक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)
१८) बाजीराव बाबुराव महाजन – (सहायक पोलिस आयुक्त लोहमार्ग, मुंबई ते उपविभागीय पोलिस अधिकारी मनमाड उपविभाग नाशिक ग्रामीण)
१९) आशित नामदेव कांबळे – ( उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक उप विभाग नागपूर ग्रामीण ते उपविभागीय पोलिस अधिकारी चांदूर रेल्वे उपविभाग, अमरावती ग्रामीण)
२०) गणेश सोनाजीराव बिरादार – (पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण नाशिक ते समादेशक रा.रा.पोलीस बल गट क्र.५, दौंड, जि.पुणे)
२१) विक्रम साळी – (सहायक पोलिस महानिरिक्षक नियोजन व समन्वय पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय ते प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला)
२२) अशोक धर्माजी इंदलकर – (पोलीस उप अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.) गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे)


