
मिरारोड येथील नयानगर येथे शेवटी बुलडोझर चालला,१५ हल्लेखोराना केली अटक…
मुंबई (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मुंबईतल्या मीरारोड भागात दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मीरा रोडच्या नया नगरमध्ये हल्लेखोरांवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. योगी मॉडेलच्या धर्तीवर मुंबईतही कृती पाहायला मिळत आहे. 21 जानेवारीच्या रात्री श्रीरामाचे झेंडे असलेल्या वाहनांची मोडतोड करण्यात आली आणि लोकांना मारहाण करण्यात आली होती



त्याअनुषंगाने ग्रुहमंत्री देवेंद्र फडनविस यांचे आदेशाने रात्रीच मिरा भायंदर पोलिसांनी 13 आरोपींना ताब्यात घेतले तसेच देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदा बांधकामे, अवैध धंदे यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. पोलिसांनी अवघ्या 48 तासांत ही मोठी कारवाई केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मीरा रोडच्या नयानगरमध्ये दोन गटांमध्ये राडा झाल्यामुले या भागात तणाव होता. आता या भागातला तणाव निवळल्यानंतर महापालिका आणि पोलिस ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. नयानगर भागातील सर्व अतिक्रमण तोडण्याची जोरदार कारवाई करण्यात येत आहे.
मारहाणीची घटना घडल्यानंतर देवेंद्रफडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी आणखी 15 जणांना अटक केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नया नगर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नया नगर भागात दोन गटात झालेल्या वादानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आणि परिसरातील अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गृहमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर 48 तासातच पोलिसांनी अॅक्शन घेत नया नगर परिसरातील अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला.


