
मोटारसायकल चोरटा गुन्हे शाखेच्या ताब्यात…
मोटारसायकल चोरटा गुन्हे शाखेच्या ताब्यात…
धुळे (प्रतिनिधी) – मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून ५० हजार रु. माल हा जप्त केला आहे. (दि.०६मे) रोजी सहापोनि. श्रीकृष्ण पारधी, स्था.गु.शा. धुळे यांना गुप्त बातमीव्दारे माहिती मिळाली की, एका इसमाकडे शाईन कंपनीची विना क्रमांकाची चोरीची मोटर सायकल असून सदर इसम जुने धुळे येथील भोई गल्ली येथे राहतो अशी माहिती प्राप्त झाल्याने सहापोनि. श्रीकृष्ण पारधी यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकास सदर ठिकाणी जाऊन नमुद बातमीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याबाबात आदेशीत केले होते.


त्या नुसार पथकाने नमुद बातमी प्रमाणे जुने धुळे येथे जाऊन सदर इसम व मोटर सायकल शोध घेत असता, भोई गल्लीतील गढीजवळ एक इसम शाईन कंपनीची विना क्रमांकाची मोटर सायकलसह मिळुन आल्याने त्यास चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव नितिन राजेंद्र फुलपगारे (वय २७ वर्षे) व्यवसाय – भाजीपाला विक्री रा.सुभाष नगर, भोई गल्ली, जुने धुळे असे सांगितले. त्यास त्याचे ताब्यातील मोटर सायकल बाबत विचारना, केली असता त्याने सदर मोटर सायकल त्याचा मित्र नामे गोविंद रा.आठमोईदा ता.शहादा जि.नंदुरबार याने दिली असल्याचे सांगितले. ५० हजार रु. किमतीची एम.एच.१८ बी.जे. ९६२७ ह्या क्रमांकाची ग्रे रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटर सायकल ही जप्त केली आहे. सदर मोटर सायकल इसम नामे नितिन राजेंद्र फुलपगारे याचे ताब्यात मिळुन आल्याने व वरील नमुद गुन्हा उघडकीस आल्याने त्यास मुद्येमालासह गुन्हयाचे पुढील तपासकामी दोंडाईचा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.

सदरची कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक धुळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोहेकों मच्छिद्र पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संतोष हिरे, प्रल्हाद वाघ, संदीप पाटील, प्रकाश सोनार, तुषार सुर्यवंशी, प्रशांत चौधरी, योगेश साळवे यांनी केलेली आहे.



