ललित पाटील याला देशभर फिरवणार्या त्याच्या चालकास मुंबई पोलिसांनी केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मुंबई – ससुन ड्रग्ज रॅकेट माफिया ललित पाटील या प्रकरणात
आता नवनवे खुलाशे पाहायला  मिळत आहे. ललित पाटीलला बेड्या ठोकल्यानंतर आता त्याच्या चालकाला मुंबई पोलिसांनी काल रात्री उशीरा अटक केली. सचिन वाघ (वय30) असं या
चालकाचं नाव आहे. याला साकीनाका पोलिसांनी अटक केली. ललित पाटील यानी  पुण्यातील ससुन रुग्णालयातून पळ काढल्यानंतर सचिन वाघ याने विविध राज्य आणि जिल्ह्यात धावण्यासाठी मदत केली होती. गेल्या काही दिवसांपासून सतिन वाघ याने ललित पाटील याला सतत मदत केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे सचिन वाघ  याचीसुध्दा  चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत साकीनाका पोलिसांनी 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ललित पाटील यांने ड्रग्ज रॅकेटचा विस्तार फार मोठा असल्याचं उघड झालं आहे. त्यात त्यांच्या भावाबरोबरच दोन महिलांचा समावेश असल्याचं पुढे आल्यानंतर त्या महिलांनादेखील काल अटक करण्यात आली होती. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना
निकम या ललितला साथ देत असल्याचं तपासात  उघड झालं होतं. त्यांना आता 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रज्ञा ही ललित पाटीलची प्रेयसी होती. ती ललित ड्रग्ज रॅकेट चालवण्याचं प्लॅनिंग करत तसेच दोघे पुण्यातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेटायचे. या सगळ्याचे आता खासगी फोटोदेखील
बर्यापैकी व्हायरल  झाले  आहेत.
ललित पाटील नावापुरताच तुरुंगात असल्याचं स्पष्ट होत आहे. कधी ललित पाटील मॉलमध्ये तर कधी आपल्या प्रेयसीजवळ दिसत आहे. त्यातच ललित पाटील जवळ दोन आयफोनदेखील होते. या आयफोनच्या माध्यमातून ललित पाटील आपल्या
साथीदारांशी आणि प्रज्ञा कांबळेशी संपर्कात होता आणि महत्वाचं म्हणजे ससूनमध्ये त्याचा चांगला पाहुणचार सुरु असल्याचंदेखील या फोटोत दिसत आहे. ससूनमधील खिडकीत बसून तो सिगारेट
ओढतानाचा देखील फोटो व्हायरल झाले आहेत
बसल्या जागेवरुन ललित पाटीलने अनेकांना कामाला लावलं होतं तर अनेकांचा नशेच्या जाळ्यातदेखील ओढलं होतं. यापूर्वीही एका चालकाला अटक करण्यात आली होती ,7 ऑक्टोबरला ललित पाटीलला ससूनमधून पळून गेल्यानंतर रावेतपर्यंत सोडणाऱ्या चालकाला अटक केली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई
केली होती. दत्ता डोके असं या गाडी चालकाचं नाव आहे डोके हा ससूनमध्ये भरती असलेल्या दुसऱ्या आरोपीच्या संपर्कात असल्याचे कळते





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!