
अजनी पोलिसांनी MD पावडर सह एकास घेतले ताब्यात….
अवैधरित्या विक्रीकरीता एम.डी. पावडर बाळगणाऱ्यास अजनी पोलिसांनी केले जेरबंद…..
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १९ जाने चे संध्या. चे दरम्यान, अजनी पोलीसांनी गोपनीय माहीती मिळाली की एक ईसम ॲक्टीव्हा गाडीवर मेडीकल हॉस्पीटल नेत्र विभागासमोर एम डी पावडर विक्रीकरीता घेऊन येतोय अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून नमुद ठिकाणी सापळा रचुन, मेडीकल हॉस्पीटल नेत्र विभाग समोरील आमरोडवर छापा टाकुन तेथे एका अॅक्टीवा गाडी क्र. एम.एच ४९ एस. ५८७७ वरील संशयीत ईसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव प्रशांत विश्राम चुटे, वय ३४ वर्षे, रा. प्लॉट नं. ७२, रामबाग, ईमामवाडा, नागपूर असे सांगीतले.


त्याची व दुचाकीची झडती घेतली असता, त्याचे ताब्यातुन एका झिपलॉक पन्नीमध्ये ४.२३ ग्रॅम एम.डी. पावडर मिळुन आली. आरोपीचे ताब्यातुन एम.डी. पावडर, एक मोबाईल फोन व अॅक्टीवा वाहन असा एकुण ७८,५००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता एम.डी. पावडर विक्री करण्याकरीता आणल्याचे सांगीतले.त्यावरुन सदर आरोपीविरुध्द कलम ८ (क), २२ (ब) एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार पोलिस ठाणे अजनी येथे गुन्हा नोंदविण्यात आला असुन. आरोपींस अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त(दक्षिण विभाग) शिवाजीराव राठोड,पोलीस उप आयुक्त (परि.४) रश्मीता राव,सहा. पोलिस आयुक्त (अजनी विभाग)विनायक कोते, यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. नितीनचंद्र राजकुमार, पोनि(गुन्हे) लक्ष्मण केंद्रे, पोउपनि. अंकीत आंबेपवार, पोहवा. ओंकार बाराभाई, पोशि नितीन सोमकुंवर, अश्वीन सहारे, नरेश श्रावणकर, मनिष भलमे व रोशन वाडीभस्मे यांनी केली.



