वेश्या व्यवसायावर नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा…
वेश्या व्यवसायावर नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची धाड…
नागपूर (प्रतिनिधी) – नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर वेश्या व्यवसायावर धाड टाकून दोन पीडितांची सुटका केली आहे. मिळालेल्या पिडीत महीलांना पैशांचे आमिष दाखवून नमुद व्यवसायाचे प्रलोभन व वेश्याव्यवसाया करीता ग्राहकांना आपले निवासस्थान देणाऱ्या दोन महीला १) प्रीया उर्फ इमली रामभजन धुसीया, २) ममता प्रभाकर तिवारी उर्फ बोन्द्रे, ह्यांना कायदेशीर तरतुदीनुसार सूचना त्रानवर सोडण्यात आले, वर नमूद दोन्ही महीला आरोपी विरूद्ध पोलिस ठाणे वाठोडा येथे अप.क्र. २६७/२०२४ कलम ३ (२) (क), ४, ५,७ अनैतीक व्यापार प्रतीबंध कायदा-१९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत अधिक माहिती अशी की, पो.ठाणे. वाठोडा, नागपूर शहर हद्दीत प्लॉट क्र.९७, ऑरेंज नगर, शिवशक्ती मंदीर मागे, वाठोडा येथे प्रिया नावाची महीला ही जास्तीच्या पैशाचे आमिष देवुन गरजु महीलांना वेश्याव्यवसायाकरीता प्रवृत्त करत होती. तसेच ग्राहकाचे पसंतीनुसार नगद तसेच ऑनलाईन माध्यमाने पैसे स्वीकारून समागमाकरीता मुलगी महीला उपलब्ध करून देत होती. सामाजीक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, नागपूर शहर यांना मिळालेल्या गुप्त माहितीची शहानीशा करून दोन पंचासमक्ष (दि.११मे) रोजी १९:१५ वा. २२:४५ वा. दरम्यान प्लॉट क्र.९७, ऑरेंज नगर, शिवशक्ती मंदीर मागे, वाठोडा नागपूर शहर येथे कायदेशीर तरतुदीनुसार टाकलेल्या धाडीमध्ये दोन पिडीत महीला मिळुन आल्या.
वर नमुद ठिकाणी मिळालेल्या दोनही पिडीतांची सुरक्षित सुटका करण्यात आली. तसेच नमुद व्यवसायात आरोपी हे व्यवसायाकरीता जागा उपलब्ध करून तीच्या व्यवसायात भागीदारी करतांना मिळुन आले. मिळालेल्या पिडीत महीलांना नमुद व्यवसायाचे प्रलोभन व वेश्याव्यवसाया करीता ग्राहकांना आपले निवासस्थान देणाऱ्या दोन महीला
१) प्रिया उर्फ इमली रामभजन धुसीया, २) ममता प्रभाकर तिवारी उर्फ बोन्द्रे, ह्यांना कायदेशीर तरतुदीनुसार सूचनात्रानवर सोडण्यात आले, वर नमूद दोन्ही महीला आरोपी विरूद्ध पोलिस ठाणे वाठोडा येथे अप.क्र. २६७/२०२४ कलम ३ (२) (क), ४, ५,७ अनैतीक व्यापार प्रतीबंध कायदा-१९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अशा प्रकारे सदरची कारवाई पोलीस आयुक्त, नागपुर शहर रविन्द्र सिंगल, सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपुर शहर संजय पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे), नागपुर निमीत गोयल, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपुर शहर अभिजीत पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कविता इसारकर, पोहवा. सचिन बढिये, पोहवा. लक्ष्मण चौरे, पोहवा. प्रकाश माथनकर, नापोशि शेषराव राऊत, अजय पौनीकर, पोशि. अश्विन मांगे, समीर शेख, नितीन वासने, कुणाल मसराम, मपोहवा. लता गवई, मपोअं पुनम शेंडे, सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा नागपुर शहर यांनी केली आहे.