
ईलेक्ट्रिक वर्कशॅापमधील कॅापर वायर चोरीचा गुन्हा कलमना पोलिसांनी केला उघड,मुद्देमालासह ३ आरोपींना घेतले ताब्यात….
कलमना पोलिसांनी संशईत चोरट्यांना ताब्यात घेऊन ईलेक्ट्रीक वर्कशॅाप मधील चोरीचा गुन्हा केला उघड, ०३ आरोपींना केली अटक…..
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पवन गुलाबराव भुते, वय ४२ वर्षे, रा. गाडीखाना, टिळक पुतळा, महाल, नागपुर यांनी पोलिस स्टेशन कळमना येथे तक्रार दिली की त्यांचे न्यू गुलाब ईलेक्ट्रीक वर्कशॉप, चिखली ले-आऊट ७२/ए, कळमणा, नागपूर येथे मोटार रिवाइंडींगचे वर्कशॅाप हे दि १९ जानेवारी ते ३०.जानेवारी २०२५ रोजी ते मोटर रिवाईडींगचे वर्कशॉप बंद करून व कुलुप लावुन फिर्यादी पवन गुलाबराव भुते, वय ४२ वर्षे, रा. गाडीखाना, टिळक पुतळा, महाल, नागपुर हे आपले घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे वर्कशॉपचे शटरचे कुलूप तोडुन आंत प्रवेश करून, दुकानात ठेवलेला स्कॅपचे कॉपर ६०० किलो एकुण किंमती अंदाजे ४,८०,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.


यावरुन फिर्यादी पवन गुलाबराव भुते, वय ४२ वर्षे,यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे कळमणा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हयाचे तपासादरम्यान कळमणा पोलिसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीवरून व तांत्रीक तपास करून यातील आरोपी क. १) कुलदिप सिंग रंजीत सिंग वय ३२ वर्ष रा. गाव रामपूर, ता. जि. बरेली, ह.मु., डिप्टी सिग्नल, ललवा पानठेल्या जवळ, कळमणा, नागपूर २) हेमराज दयाराम शाहु वय २८ वर्ष रा. डिप्टी सिग्नल, सेलोकर किराणा दुकाना जवळ, कळमणा, नागपूर ३) अजय ईश्वर बंजारे वय २४ वर्ष रा. मिनीमाता नगर, गल्ली नं. १, कळमणा, नागपूर यांना निष्पन्न करुन ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी संगणमत करून वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपींचे ताब्यातुन चोरी केलेल्या मुद्देमाला पैकी स्क्रॅपचे कॉपर ४५० किलो एकुण किंमती अंदाजे ३,६०,०००/- रू. चा जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविन्द्रकुमार सिंगल, सह पोलिस आयुक्त निसार तांबोळी, अपर पोलिस आयुक्त,(उत्तर विभाग). प्रमोद शेवाळे, पोलीस उप आयुक्त (परि. ५),राहुल माकणीकर,सहा. पोलिस आयुक्त कामठी विभाग विशाल क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. प्रविण काळे, पोनि. सतीश आडे (गुन्हे), पोउपनि. संतोषकुमार रामलोड, सफौ. दिपक धानोरकर, पोहवा. रविकुमार शाहु, प्रदीप पवार, पोअं. संतोष पांडे, मंगेश लोही, संदीप ढाले यांनी केली.


