बंद प्लॅास्टीकचे कारखान्यात चोरी करणारी टोळी कोराडी पोलिसांनी केली गजाआड….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बंद प्लॅास्टीक चे फॅक्टरीमधे चोरी करणारे आरोपी कोराडी पोलिसांचे मुद्देमालासह ताब्यात…

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विशाल कैलाश विरवानी  वय ३५ वर्षे रा भारत कॉप्लेक्स प्लॉट नं २२३, जरीपटका नागपूर यांनी पोलिस स्टेशन कोराडी येथे तक्रार दिली की फिर्यादी विशाल कैलास विरवानी वय 35 वर्ष रा भारत कॉम्प्लेक्स  प्लॉट नं 223 जरीपटका नागपूर आणि त्याचे मामा शंकरलाल कैलास वासवाणी यांची महालक्ष्मी ड्रम कंपनी चे मागे प्लॉट नं 3 और 4 वर छदानी प्लॉस्टीक ची कंपनी असून फिर्यादी आणि फिर्यादीचे मामा असे त्यांच्यात एक वर्षापुर्वी वाद झाल्याने तेव्हा पासून कंपनी बंद ठेवण्यात आलेली होती. त्यामध्ये प्लास्टीक चे घमीले प्लॉस्टीक चे टफ, प्लॉस्टीक चे पाटे आणि प्लॉस्टीक चे स्टुल आणि Motor 60 HP 1,00,000/- Motor 20 HP मशिन 3 किंमत 3,00,000/-रू Motor 40 HP मशिन 2 किंमत मशिन 2 किंमत 60,000/-रू, Motor 10 HP मशिन 2 किंमत 20,000/-रू, Motor 5 HP मशिन 1 किंमत 20,000/-रु, Motor 3 HP मशिन 1 किंमत 10,000/-रू. असा एकुन 5,10,000/-रू 2) Die (mould) – injection mould – 15 pc इत्यादी साहित्य कंपनी बंद असल्याचा फायदा घेवून अज्ञात कंपनीचे  लॉक तोडून कंपनीचे आत प्रवेश करून आरोपीनीं चोरुन नेले यावरुन पोलिस स्टेशन कोराडी येथे फिर्यादीचे रिपोर्ट वरून अप. कमांक 19/25 कलम 305, 331(3), 331, (4),3(5) भारतीय न्याय संहिता गुन्हा नोंद  करण्यात आला होता





सदर गुन्ह्यांचे तपासात सिसीटिव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणा आधारे व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती वरून संशईत आरोपी  मो. ईकबाल मो. ईब्राहिम वय ३५ वर्ष रा. सैलाब नगर, कामठी पो. ठाणे नविन कामठी नागपूर शहर यास  ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हयातील प्लॅस्टीकचे घमेले, टप व लहान मोठे स्टूल व लोखंडी मोटर इत्यादी मुद्देमाल हे आरोपी  कूदस्त खान वल्द ईस्माइल खान वय ५५ वर्ष रा.आसी नगर, ताज होटेल च्या मागे, टेका नागपूर मो. सलीम वल्द मो. ईस्माइल वय ४२ वर्षे रा. उप्पलवाडी, कायनात कॉलोनी गोविंदगड, पो. ठाणे कपिल नगर, नागपूर यांचे सह आरोपी  अरबाज उर्फ शाहरूख अयूब कादरी वय २५ वर्षे रा. कवठा गाव, गुलमोहर सोसायटी, पो. ठाणे कोराडी नागपूर शहर याचे सोबतीने चोरी केल्याचे कबूल केले



तसेच गुन्हयात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 1) एक थ्री व्हिलर आटो कमांक MH-40-BF-0197 किमती अंदाजे 1,50,000 रू2) कंपनीतून चोरीस गेलेले प्लॅस्टीकचे टप, घमेले व लहान मोठे स्टूल एकूण 970 नग किं 100/रू प्रमाणे एकूण 97,000/-रू 3) एक महेंद्रा झायलो गाडी कमांक MH-27-AR-7786 पांढ-या रंगाची किमती अंदाजे 8,00,000/- रू 4) कंपनीतून चोरीस गेलेले प्लॅस्टीकचे दाने नी भरलेली एकूण 200 बोरी किंअं प्रत्येकि 3000/-रू प्रमाणे एकूण 6,00,000/-रू 5) एक होंडा कंपनीची शाईन गाडी के MH-49-CG-7761 कि.अं 50,000/-रू 6)) एक हिरो कंपनीची पेंशन प्रो गाडी के MH-49-Y-9757 किं. अं 50,000/-रु 7) एक मशीन मध्ये वापरणारा स्टील चा रॉड कि अं 20,000/- 8) एक लोखंडी मोटर कटलेली किं.अं 20,000/-रू 9) मोटर मधून वेगळा केलेला तांबा वजन अं.20 कि. किं अं 20,000/-रू 10) एक बजन करायचा काटा किं.अं 20,000/-रू आ एकूण 18,07,000/- रू (अठारा लाख सात हजार रू) चा मुद्देमाल व आरोपी अरबाज उर्फ शाहरूख अयूब कादरी याचे मदतीने आरोपी जूनॆद जावेद अंसारी वय ३० वर्षे रा. हबीब नगर, टेका, पो. ठाणे पाचपावली नागपूर, रियाज अहमद अंसारी वय ४२ वर्षे रा. ताज नगर, टेका पो. ठाणे पाचपावली, वलीद जावेद अंसारी वय २४ वर्षे रा. टिमकि पनईपेठ, पो. ठाणे तहसिल नागपूर, घनश्याम परसराम कटरे वय ४२ वर्षे रा.२ नंबर नाका, कामठी नाका, खसाळा पो. ठाणे कपिल नगर, नागपूर, रितेश भागवत मेश्राम वय ३८ वर्षे रा. यादव नगर, गल्ली नं २, पो. ठाणे यशोधरा नगर, नागपूर यांनी मिळुन चोरी केल्याचे कबूल केले असून सदर आरोपी जवळून वरील नमूद वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हयात अधिक तपास सुरु आहे.



सदरची कार्यवाही ही पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, सह. पोलिस आयुक्त  निसार तांबोळी, अप्पर पोलिस आयुक्त उत्तर विभाग, प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त परीमंडळ ५ निकेतन कदम सहा पोलिस आयुक्त(कामठी विभाग) विशाल क्षिरसागर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे कोराडी वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रविण पांडे, सपोनि विनोद मातरे, पोउपनि सचिन धात्रक, पोहवा राजेश जाधव, नापोशि नरेश उके, पोशि प्रताप शेळके, निरंजन सोनपिपरे,निलेश राठोड, चापोहवा मनोज अंधारे , वानापोशि अमित शर्मा पोठाणे कोराडी नागपूर आणि पोशि आशिष ६९५३, पोशि सचिन १६०९२ परिमंडळ कं ५, सायबर सेल नागपूर

 

 

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!