बनावट कागदपत्रे तयार करुन लोकांचे भुखंड विकणार्या टोळीवर शहर पोलिसांची मोक्का ची कार्यवाही….
बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉटविक्री करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई.…..
नागपुर पोलिसांनी उघड केला लोकांचे भुखंडावरचे श्रीखंड खाणारे टोळीचा पर्दाफाश,मोठे मासे गळाला लागणार…
नागपूर (प्रतिनिधी) – नागपूर मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मध्ये खोटे बनावटी कागदपत्र तयार करून भूखंड विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १८ आरोपींवर मोक्का कायद्या अंतर्गत पोलिस ठाणे सदर, नागपूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी – सौ. निशा राजकुमार जाजु (वय ६३ वर्षे), रा.प्लॉट नं.५८ सी, – निकुंज नवजीवन कॉलोनी, गजानन नगर, कोठारी हॉस्पीटलच्या मागे, पो.ठाणे अजनी, नागपूर शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ७०६/२०२३ कलम ४१९,४२०,४६५,४६७, ४६८,४७१,३४ भादंवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी निशा राजकुमार जाजू यांनी मौजा नारा येथे १९९२ साली तीन हजार चौरस फुटांचा प्लॉट खरेदी केला होता. या टोळीने खोटी महिला उभी करून इमाम खान अब्दुल रहीम खान याला पाच लाखात प्लॉटची विक्री केली. बनावट महिलेच्या बॅक खात्यातून प्रवीण सहारे हा आरोपी पैसे काढण्यासाठी आला असता त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर विक्रीपत्रात साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणारे पवनकुमार जंदेला, कौशल हिवंज, अथर्व भाग्यवंत यांना अटक करण्यात आली होती. सहारेच्या मोबाईलचा तपास केला असता टोळीची माहिती समोर आली होती. सह दुय्यम निबंधक याच्या कार्यालयात काम करणारा कार्तीक उर्फ रजत लोणारे यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता तो दुय्यम निबंधक कार्यालयातून त्याच्या ओळखीचा सिद्धार्थ चव्हाण याला रेकॉर्डमधून कागदपत्रे पुरवित असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कार्तीक उर्फ रजत लोणारे व सिध्दार्थ चव्हाण यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी इमरान अली या आरोपीच्या वाहनाची झडती घेतली असता त्यात अनेक बनावट नोटा व बोगस कागदपत्रे आढळून आली. या नोटा त्याने मोहम्मद रियाझ याच्याकडून घेतल्या होत्या. या टोळीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्या नुसार पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
या मध्ये पोलिसांनी १) विविध मुळ विक्रीपत्र २) खोटे बनावटी आधार कार्ड ३) खोटे बनावटी पॅन कार्ड ४) विविध बनावटी विक्रीपत्र ५) विविध विक्रीपत्राचे कोरे नमुने ६) नागपूर सुधार प्रन्यास येथील विविध भुखंडाच्या फाईल ७) नागपूर सुधार प्रन्यास येथील विविध मुळ कागदपत्र ८) सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयातुन प्राप्त करण्यात आलेली विक्रीपत्राच्या झेरॉक्स प्रति १) विविध एनए ऑर्डर ची प्रत काही मुळ तर काही बनावटी १०) ५०० रुपयाच्या नकली तयार केलेल्या नोटा एकुण १२ व ते तयार करण्याचे कागदपत्र ११) तीन कार (ऑडी, स्विफ्ट डिजायर, फोर्ड) १२) दोन दुचाकी (एक्टीवा, टिव्हिएस) १३) रबरी स्टॅम्प विक्रीपत्रावर लावण्यात येणारा स्टॅम्प १४) नागपूर सुधार प्रन्यास येथे सादर केलेले विविध नकाशे मुळ १५) भुमि अभिलेख कार्यालयातील विविध नकाशे १६) बनावटी स्टॅम्प तिकीट १७) नागपूर शहर व आजूबाजुच्या तालुका येथे असलेल्या जमीनी व शेती कागदपत्राची झेरॉक्स प्रती. १८) विविध बँकेमध्ये बनावट खाते तयार केल्याचे धनादेश पुस्तिका १९) विविध बँकेत तयार करण्यात आलेल्या बनावट खात्याचे पासबुक २०) बँकेचे आरटीजीएस चे कोरे फॉर्म २१) विविध लोकांचे पासपोर्ट फोटो २२) तसचे काही लोकाचे व्यवसायाचा गोमास्ता २३) गुन्हयाच्या अनुषंगाने तयार केलेले व प्राप्त कागदपत्र आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, दि.३८/२/३०२३ रोजी नागपुर दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग २ येथे यातील आरोपी यांनी संगणमत करुन यातील फिर्यादीच्या नावाने खोटे कागदपत्र तयार करुन यातील फिर्यादीच्या नावाचा वापर करुन यातील फिर्यादी नामे सौ. निशा राजकुमार जाजु हिच्या नावावर असलेला वार्ड व मुधा क्र.४, अंतर्गत मौजा नारा,प.हनं.११, खसरा कमांक १३९, भुखंड कमांक ८९,९० एकूण क्षेत्रफळ ३००० चौ. फुट हा दस्त कमांक ११८६ दि.१८ नोव्हेंबर १९९२ रोजी फिर्यादी यांनी खरेदी केला होता. नमुद प्लॉट यातील आरोपींनी संगणमत करुन आरोपी नामे इमाम खान अब्दुल रहीम खान (वय ३३ वर्षे) यास विक्री करण्याचा बहाणा करुन यातील फिर्यादीच्या प्लॉटचे ५,००,०००/- रु ला विक्री करुन फसवणुक केली जेव्हा फिर्यादिचे पती इनकम टैक्स रिटर्न भरणा करण्याकरीता सीए कडे गेले असता माहीती पडल्याने त्यांनी आपल्या पती सोबत दुयम निबंधक कार्यालय नागपूर येथे जाऊन चौकशी केली असता त्यांना माहीती मिळाली की, त्यांच्या नावावर असलेला भुखंड हा त्यांचे नावाचे खोटे कागदपत्र व बनावट महिला हिला उभे करुन भुखंडाची विक्री केल्याचे समजुन आल्याने फिर्यादी यांनी पोलिस ठाणे सदर, नागपूर शहर येथे दिलेल्या अर्जावर चौकशी अंती फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरुन आरोपी नामे इमाम व इतर ७ यांच्या विरुध्द अपराध क्र.७०६/२०२३ कलम ४१९,४२०,४६५,४६८,४७१,३४ भा.दं.वि. वाढीव कलम ४६७ भादंवी प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्हयाच्या प्राथमिक तपासा दरम्यान आरोपी यांना गुन्हा दाखल झाल्याची माहीती मिळाल्यावरुन सर्व आरोपी पसार झाले होते. दरम्यान नमुद गुन्हयातील बनावट महिला सौ.निशा राजकुमार जाजु हिने तिचे बनावट नावाचे खाते हे महाराष्ट्र स्टेट को.ऑपरेटिव्ह बैंक मुंबई, बेहरामजी टाउन, सदर शाखा नागपूर येथे यातील अटक आरोपी प्रविण सहारे हा तिच्या बनावट खात्यातुन पैसे ट्रान्सफर करण्याकरीता आला असता नमुद बँकेच्या अधिकारी यांनी प्रविण सहारे यास पैसे देण्यास नकार दिल्याने प्रविण सहारे हा नमुद बँकेच्या मुख्य शाखेत जाऊन पैसे ट्रान्सफर करण्याच्या तयारीत असतांना त्यास गोपनीय बातमीदार याच्या माहीती वरुन त्यास अटक करण्यात आलेली आहे. त्यास नमुद गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देऊन गुन्हयात वेळ काढुपणा केला व त्यास न्यायालयाने मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. त्यानंतर नमुद गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील विक्रीपत्रामध्ये साक्षीदार म्हणुन स्वाक्षरी करणार पवनकुमार जंदेला, बनावट निशा राजकुमार जाजु हिच्या बैंकेतुन ऑनलाईन स्वरुपात पैसे प्राप्त करणारे कौशल हितंज, अथर्व भाग्यवंत यांना अटक करण्यात आली होती. तसेच आरोपी प्रविण सहारे याच्या जप्त मोबाईल मधुन असे दिसुन आले की, प्रविण सहारे हा इतर आरोपीच्या मदतीने खोटे बनावटी कागदपत्र तयार करून प्लॉट विक्रीचा रॅकेट मध्ये सहभागी आहे, यावरुन नमुद गुन्हयात सह दुयम निबंधक याच्या कार्यालयात काम करणारा कर्मचारी, त्याच्या परीचीत आरोपी याने मागणी केल्याप्रमाणे रेकॉर्ड मधुन कागदपत्र पुरवित असल्याचे निष्पन्न झाले. तसेच नागपूर शहरात इतर पोलिस ठाणे येथे दाखल असलेल्या या प्रकारच्या गुन्हयाची माहीती प्राप्त करुन त्या माहीतीचा अभ्यास केला. असता तसेच पोलिस ठाणे सदर नागपूर शहर येथे दाखल अपराध क्र.२३०/२०२३ या गुन्हयातील आरोपी मोहम्मद रिजवान याचा सहभाग असल्याचे दिसुन आल्याने त्यास नमुद गुन्हयाच्या तपासात ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने माहीती दिली की, नमुद गुन्हयात आरोपी इमाम स्वान व प्रविण सहारे याच्या सांगण्यावरुन त्याने आरोपी नासीर खान याच्या मदतीने बनावट महिला हिचे नावावे खोटे आधार कार्ड व पॅनकार्ड तयार केले आहे. तसेच आरोपी इमरान अली याने नमुद भुखंडावे खोटे कागदपत्र तयार केल्याचे माहीती दिल्याने यातील आरोपी इमरान खान यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस करुन त्याच्या जवळील वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये वर नमुद जप्ती मधील काही कागदपत्र मिळुन आल्याने त्यास पोलिस ठाणे येथे आणुन अधिक विचारपुस करुन त्याच्या जरीपटका येथील घरी घरझडती व त्याच्या घरा समोर उभ्या असलेल्या ऑडी कारची झडती घेतली असता गुन्हयातील जप्त केलेले इतर कागदपत्र तसेच नकली बनावटी नोटा मिळुन आलेल्या आहेत. त्या बनावटी नोटा त्याने कोठुन प्राप्त केल्या याबाबत तपास सूरु आहे. तसेच यातील आरोपी नामे मोहम्मद रियाज याच्या घराची व त्याच्या कारची तपासणी केली असता त्याच्या कारमधुन वर नमुद जप्त मुद्देमालाचे कागदपत्र मिळुन आले आहेत. तसेव अपराध कमांक २३०/२०२३ मध्ये आरोपी इरशाद अहमद निसार अहमद याच्या जवळुन तपासी अधिकारी पोउपनि नारायण घोडके यांनी घर झडती दरम्यान बरेच कागदपत्र व बनावटी आधारकार्ड प्राप्त केले असुन नमुद गुन्हयातील फिर्यादी सौ. निशा राजु हिचे नावाची नागपूर सुधार प्रन्यास ची फाईल सुध्दा मिळुन आलेली आहे. तरी नमुद कागदपत्राची पाहणी केली असता असे दिसुन येते की, यातील आरोपी हे टोळीनिशी काम करुन त्यांनी नागपूर शहर व आजुबाजुच्या भागातील ब-यात जमीनी बनावट कागदपत्राच्या आधारे खोटे कागदपत्र तयार करुन विकी केलेले आहे.
नमुद आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता असे दिसुन आले की, यातील आरोपी हे संघटीतरित्या गुन्हे करण्याचे सवयीचे असुन त्यांच्या विरुध्द नागपूर शहरात विविध गुन्हे दाखल आहे नमुद आरोपी हे संघटीत रित्या गुन्हे करीत असल्याचे दिसुन आल्याने नमुद आरोपीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा -१९९९ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, नागपूर शहर यांच्याकडे सादर केला असता त्यांनी नमुद प्रकरणात मोका कायदया अंतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने नमुद गुन्हयात एकुण १८ आरोपी विरुध्द (दि.१२मार्च) रोजी खालील आरोपींवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे नावे पुढीलप्रमाणे –
१) इमाम स्वान अब्दुल रहीम खान (वय ३३ वर्षे), रा.बेसा बेलतरोडी, नागपूर,
२) पवनकुमार कालकाप्रसाद जंगेला (वय ३४ वर्षे), रा.मनिष नगर, बेसा बेलतरोडी, नागपूर. ३) नारायण वर्मा क्य ४० वर्षे रा. बिनाकर आचास कॉलोनी, बिनाली शिवणी मध्यप्रदेश,
४) बनावट निशा जाजु उर्फ प्रतिभा विलास मेश्राम (वय ४६ वर्षे), रा.उमरेड, नागपूर ग्रामीण,
५) विजय उईके
६) कौशल संजय हितंज (वय २२ वर्षे),परसोडी वर्धा रोड, नागपूर.
७) अथर्व श्रीकृष्ण भाग्यवंत (वय २२ वर्षे), रा.गोपाल नगर, नागपूर,
८) भुपेश कवडुजी शिदि (वय ४० वर्षे), शंकरपुर बेलतरोडी, नागपूर १) प्रविण मोरेश्वर सहारे (वय ४६ वर्षे), रा.गोधनी मानकापूर नागपूर,
१०) साहील बिलाल शेख (वय २३ वर्षे), रा.भामटी रोड, सुजाता ले आउट, नागपूर, ११) कार्तीक उर्फ रजत शिवराम लोणारे वय ३० वर्षे र मेहंदीबाग रोड, शांतीनगर,
१२) सिध्दार्थ वासुदेव चव्हाण (वय ४० वर्षे), रा.प्लॉट नं. २९, स्नेहदिप कॉलोनी, जरीपटका, नागपूर,
१३) मोहम्मद रियाज उर्फ बबलु अब्दुल उफ (वय ५४ वर्षे), रा.कसाबपुरा, मोमीनपुरा तहसील
१४) नासीर हसन खान (वय ४३ वर्षे), रा.स्वागत नगर, गिट्टीखदान,
१५) इमरान अली अख्तर अली (वय ४३ वर्षे), रा.संजय बाग कॉलोनी, यशोधरानगर, नागपूर,
१६) रुपेश अरुण वारजुरकर (वय ३४ वर्षे), रा. महात्मा फुले नगर, अजनी नागपूर,
१७) मोहीत अली मोहमुद अली (वय ३२ वर्षे), रा.प्लॉट नं. ४२, कोराडी रोड, सल्फीयाबाग, मानकापूर.
१८) इरशाद अहमद निसार अहमद (वय ४५ वर्षे), रा.भानखेडा, मोमीनपुरा नागपूर,
सदरची कार्यवाही ही डॉ. रविन्द्रकुमार सिंघल, पोलिस आयुक्त नागपूर शहर, श्रीमती अश्वती दोर्जे सह पोलिस आयुक्त, प्रमोद शेवाळे, अपर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, नागपूर शहर, राहुल मदने, पोलिस उप आयुक्त, परि २ नागपुर शहर, माधुरी बाविस्कर सहा पोलिस आयुक्त, सहा.पोलिस आयुक्त सदर विभाग, नागपूर शहर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनिष ठाकरे, पो.ठाणे सदर, नागपूर शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संतोष शिरडोळे, पोहवा सुनिल राउत, पोहवा प्रलेश कापसे, मपोहवा सविता नाहमुर्ते, नापोशि संजय यादव, पोशि किशोर लोहकरे, पोशि.विक्रमसिंग ठाकुर, मपोशि संघदिपा सदावर्ते, सर्व नेमणुक पोलीस स्टेशन सदर, नागपूर शहर यांनी पार पाडली आहे.