
नागपुरात पुन्हा एकदा शस्रसाठा केला जप्त,दिवाळीच्या सनाच्या तोंडावर नागपुर पोलिस अलर्ट मोडमधे…
नागपूर(प्रतिनिधी) – दिवाळीच्या तोंडावर नागपूर पोलिसांनी
मोठी कारवाई केली आहे. चार दिवसांपूर्वीच एका लॉज मालकाच्या खुनाच्या प्रकरणाचा तपास करत असताना तहसील पोलिस स्टेशनच्या पथकाच्या कारवाईमुळे नागपुरात विकल्या जाणाऱ्या पिस्तूल विक्रीचे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले होते. या प्रकरणात तब्बल 9 पिस्तूल, 1 देशी कट्टा आणि 85 जिवंत काडतुसह दोघांना
अटक करण्यात आलं होत. त्यातच आज पुन्हा नागपूर पोलिसांनी 9 पिस्तूलं आणि 48 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत यावरुन असं दिसतय की सध्या नागपूर पोलिस ऍक्टिव मोडमध्ये असल्याचं सिद्ध झालं आहे.
नागपूर शहर हे राज्याची उपराजधानी आहे. याच उपराजधानी गेल्या काही काळापासून गुन्हेगारी चांगलीच फोफावत आहे. एकीकडे गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून दुसरीकडे गुन्हेगारीचं स्वरुप देखील बदलत आहे. त्यातच पुन्हा नागपूर तहसील पोलिस स्थानकाच्या
कारवाईमुळे पिस्तूल विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचे मोठे रॅकेट उघडकीस आलं आहे. त्यामुळे नागपुरातील गुन्हेगारी विश्वात मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणली जात असल्याचं अधोरेखित झालं असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या घटनांमुळे नागपुरात आणखी किती प्रमाणावर शस्त्रपुरवठा केला गेला आहे किंवा केला जाणार आहे, याचा तपास सध्या नागपूर पोलिस करत आहेत.
नागपुरात 25 ऑक्टोबर रोजी तहसील पोलिस स्थानकाच्या हद्दीत मोमीनपुरा परिसरात एका खाजगी गेस्ट हाऊस संचालकांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना फिरोज खान नावाच्या गुन्हेगाराने हत्या करणाऱ्या
आरोपींना पिस्तूल आणि गोळ्या पुरवल्याचं समोर आलं होत. दरम्यान फिरोज खान याच्या चौकशीत मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील इमरान आलम हा गुन्हेगार नागपुरात मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करत असल्याचे उघड झाले होते. तेव्हा फिरोज खान आणि इमरान आलम यांच्या दोन ठिकाणातून 9 पिस्तूलं आणि 84
काडतुसं जप्त करण्यात आली होती. दरम्यान इमरान आलमच्या चौकशीत आणखी 7 पिस्तूलं आणि 48 काडतूसं जप्त करण्यात नागपूर पोलिसांना यश आलेल आहे.


सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त यांच्या आदेशाने पोलिस उपायुक्त परीमंडळ ३ गोरख भामरे यांचे सुचनेनुसार तहसील पोलिस निरीक्षक विनोद पाटील करत आहेत



