
अजनी नागपुर येथे घरफोडी करणारी आंतराज्यीय टोळीस ४ दिवसात केले जेरबंद,गुन्हे शाखा युनीट ४ ची कामगीरी…
अजनी परीसरात घरफोडी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनीट ४ ने केली अटक,१३,४५,६७५/-रु चा मुद्देमाल केला जप्त…
नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०६.०१.२०२४ चे ०९.४५ वा. ते दि. ०७.०१.२०२४ चे ०९.३० वा. दरम्यान, पोलिस ठाणे अजनी हद्दीत प्लॉट नं. १०१, गल्ली नं. ५, बजरंग नगर, सिध्देश्वर हॉल जवळ, राहणारे फिर्यादी सुनिल विनायक तिमांडे, वय ६३ वर्षे, हे आपले राहते घराला कुलूप लावुन परिवारासह कॅलीफोर्नीया अमेरीका येथे मुली कडे गेले असता,
कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे खिडकीचे लोखंडी गज कापुन घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने,एक आयपॅड, तिन मोबाईल असा एकुण ६,२३,००० /- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिनांक १०.०१.२०२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे अजनी येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ४५४, ४५७,३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान गुन्हेशाखा युनिट ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी सायबर विभागा मार्फत तांत्रीक तपास करून आरोपींचा गुजरात मुंबई येथे शोध घेतला असता


आरोपी क्र १) मोल्ला मुस्ताक मोजहार वय ४० वर्ष रा. कोसाळ, गुतल, जि. सुरत गुजरात, ह.मु कोवे गाव, उर्दु शाळे जवळ, नवी मुंबई, मुळ पत्ता. माधोपपूर पोस्ट आळवा, ठाणा दिघोलीया जि. खुलना (बांगलादेश)

हा मिळुन आल्याने त्यांचे कडे सदर गुन्हया बाबत चौकशी
केली असता त्याने नमुद गुन्हा त्याचा साथिदार पाहिजे

आरोपी क्र. २) शेख बाबु शेख दाउद वय ४० वर्ष रा. ९०फीट रोड, शिवाजी नगर डेपो, मुंबई
३) समशेर रा. डोंगरी मुंबई यांचे सह केल्याची कबुली दिली. व गुन्हयातील मुद्देमाल
आरोपी क्र. ४) उज्वल चित्तरंजन पात्रा वय ३३ वर्ष रा. प्रथमेश चाळ नं. ५, आगासान रोड, ईस्ट ठाणे यास विक्री केल्याचे सांगीतले.
आरोपी क्र १ मिळुन आल्याने व गुन्हयातील मुद्देमाल विकत घेणारा आरोपी क. ४ हा सुध्दा मिळुन आला त्याचे जवळुन गुन्हयातील पिवळे धातुची (सोने) ५ टुकडयाची लगट २११ ग्रॅम, पांढरे धातुचा (चांदी)८५२.५ ग्रॅम व ओपो कंपनीचे दोन मोबाईल असा एकुण अंदाजे १३, ४५,६७५ /- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी
क्र. १ व ४ यांनी अटक करून आरोपी क. २ व ३ यांचा शोध सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) सुदर्शन मुमाक्का, प्रभारी सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा) मार्गदर्शनाखाली,
वरीष्ठ पोलिस निरीक्षक.श्याम सोनटक्के, पोउपनि अविनाश जायभाये, झाडोकर, पोहवा सुनिल ठवकर, नापोअ देवेन्द्र नवघरे, अतुल चाटे, पुरूषोत्तम काळमेघ, चेतन पाटील, पोशि संदीप मावलकर, स्वप्नील अमृतकर यांनी केली.


