
संशयीतांना ताब्यात घेऊन गिट्टीखदान पोलिसांनी उघड केले ११ घरफोडीचे गुन्हे…
पेट्रोलिंग दरम्यान संशयीतांना ताब्यात घेऊन गिट्टीखदान पोलीसांनी उघड केले ११ घरफोडीचे गुन्हे,५ आरोपी अटकेत….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत प्लॉट नं. १२८, विरचक कॉलोनी, काटोल रोड, गिट्टीखदान, नागपुर येथे राहणाऱ्या श्रीमती सरोजराणी सुरेश सिंग वय ६१ वर्षे ह्या दि(३०)मार्च रोजी रात्री घराला कुलुप लावुन त्यांचे दिल्ली येथे राहणाऱ्या मुलाकडे काही दिवसासाठी मुक्कामी गेल्या होत्या त्या दि(२२) जुन २०२४ रोजी संध्या ०७.०० वा दिल्ली येथुन नागपुरचे घरी परत आल्या असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे मुख्य दाराचे लॉक तोडुन, घरात प्रवेश करून बेडरूम मधील आलमारीतील सोन्याचे दागिने व रोख ५०,०००/- रू. असा एकुण किंमती अंदाजे २,५१,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला अशा फिर्यादी श्रीमती सरोजराणी सुरेश सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे गिट्टीखदान येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० भा. द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्हयाचे तपासात गिट्टीखदान पोलिसांनी दि(२७)ॲागस्ट २०२४ रोजी पेट्रोलींग दरम्यान एका मोपेड वाहना वरील संशयीत तिन ईसमांना गोरेवाडा परिसरात फिरतांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाणे येथे आणुन त्यांची सखोल विचारपूस केली व त्यापैकी एकाचा मोबाईल चेक केला असता नमुद मोबाईल हा गुन्हयातील चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १) रोहीत बंडु उके वय २२ वर्ष रा. बेझनबाग, टिनाची चाळ, जरीपटका, नागपूर २) हर्षल उर्फ दादु मोहनलाल गजभिये वय २१ वर्ष रा. लुबीनी नगर, जरीपटका, नागपूर ३) प्रियांशू उर्फ बाबू रवि क्षेत्री वय २० वर्ष रा. मेकोसाबाग, लुंबीनी नगर, जरीपटका, नागपूर असे सांगुन आरोपींनी वरील घरफोडी त्यांचे साथिदार ४) अभिजीत उर्फ अभि नितीन नितनवरे वय २४ वर्ष रा. गौतम नगर, जरीपटका, नागपूर ५) विशाल सुरेश प्रसाद वय २२ वर्ष रा. बेझनबाग, टिनाची चाळ, जरीपटका, नागपूर यांचे सोबत मिळुन केल्याचे सांगीतले.

आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करण्यात आली असुन अटक आरोपींची अधिक सखोल विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा पाहिजे आरोपी साथिदार मंगल सुरजीतसिंह गुलेरीया वय २१ वर्ष रा. पोळा मैदान, बिनाकी मंगळवारी, यशोधरानगर, नागपूर याचेसह मिळुन वरील घरफोडी व्यतीरिक्त पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत ईतर १० ठिकाणी अशा एकुण ११ घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन वेग-वेगळया गुन्हयातील सोन्या-चांदीचे दागिने एकुण किंमती ५,५३,६००/- रू. चे गुन्हयात वापरलेली तिन दुचाकी वाहने किंमती २,००,०००/- रू. व चार मोबाईल फोन किंमती ३९,०००/- रू. असा एकुण ७,९२,६००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहिजे आरोपीचा शोध व पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,सह. पोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त उत्तर प्रभाग प्रमोद शेवाळे, पोलिस उप आयुक्त (परि. क्र. २)राहुल मदने,सहा. पोलिस आयुक्त (सदर विभाग)माधुरी बावीस्कर यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, पोलिस निरीक्षक(गुन्हे) जितेन्द्र बोबडे, सपोनि. चेतन बोरखेडे, पोउपनि. गोपाल राऊत, पोहवा. अनिल त्रिपाठी, मंजीतसिंग, राकेश यादव, बलजीत ठाकुर, अजय यादव, ईशांक आटे, कमलेश शाहु, राजेश रेवतकर, नापोशि विशाल नांदेकर,पोशि आकाश लोथे, नागनाथ कोकरे व अमीत कुमार तांडेकर यांनी केली.


