नागपुर शहर परीसरातुन दुचाकी चोरुन त्याची तुमसर येथे विक्री करणारी टोळी गुन्हे शाखा युनीट ५ ने केली जेरबंद,६२ दुचाकी केल्या हस्तगत….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळीस ताब्यात घेऊन त्यांचेकडुन एकुण ६२ वाहनासह किंमती २०,४५,२००/- रू. चा मुद्देमाल केला जप्त,गुन्हेशाखा युनिट ५ ची धडाकेबाद कामगिरी…..

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,प्रज्वल जयदत्त भिमटे वय २५ वर्ष रा. प्लॉट नं. ६८१, पवन नगर, यशोधरानगर, नागपूर यांनी दि २६ डिसेंबर २४ला संध्या ७.०० वा.  वंडर बार, भिलगाव, ग्राम पंचायत गेट जवळील, नाल्याचे पुलावर त्यांची अॅक्टीव्हा मोपेड क. एम.एच ४० वि.वाय ७४०५ काळया रंगाची किंमती अंदाजे ४०,०००/- रु. ची हँडल लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.





तसेच दिनांक ०९.नोव्हेंबर ला फिर्यादी अपर्ण चंद्रमणी मेश्राम वय २२ वर्ष रा. नाका नं. २. खसाळा, कपिलनगर, नागपूर यांनी त्यांची हद्दीत ऑटोमोटीव्ह मेट्रो स्टेशनचे पर्किंग मध्ये ठेवलेली हिरो होन्डा मोटरसायकल क. एम.एच ४० वि.डी २६६५ किंमती अंदाजे २०,०००/- रू. ची हँडल लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्‌याने चोरून नेली.फिर्यादी यांचे तकारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते.



गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट  ५ चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून एकुण २०० ठिकानांचे सिसिटिव्ही फुटेज तपासले. युनिट ५ चे नापोशि राजु टाकळकर यांना त्यांचे गुप्तबातमीदाराकडुन माहिती मिळाली की ऑटोमोटीव्ह मेट्रो स्टेशनचे पर्किंग मधील वाहन चोरीचे गुन्हयातील फुटेज मध्ये दिसणारा ईसम हा पत्रकार भवन चौक, महाराजबाग येथे आला आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून दि २१ फेब्रुवारी रोजी सापळा रचुन मिळालेल्या वर्णनाचे ईसमास तो पळुन जाण्याचे प्रयत्नात असतांना ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आकाश किशोर खोब्रागडे वय २५ वर्ष रा. सितासावंगी, ता. तुमसर, जि. भंडारा असे सांगीतले. नमुद ईसमास गुन्हेशाखा युनिट ५ कार्यालयात आणुन सखोल विचारपूस केली असता, त्याने त्याचे साचिदार आरोपी २) आकाश संपतलाल परतेकी वय २७ वर्ष, ३) मयंक उर्फ किश विनोद बारीक वय १९ वर्ष दोन्ही रा. सितासावंगी, ता. तुमसर, जि. भंडारा यांचे सोबत संगणमत करून नागपुर शहरात मागील ०७ महिन्यात मास्टर की चे मदतीने दुचाकींचे कुलूपे उघडून अनेक दुचाकी वाहने चोरी केल्याची कबुली दिली. व नमुद चोरी केलेले वाहने तहसिल कार्यालया जवळ, तुमसर, जि. भंडारा येथील दिपक बाईक रिपेअरींग दुकान येथे दुकान मालक दिपक द्वारकाप्रसाद बिजांडे वय २४ वर्ष व त्याचा भाऊ  विजय उर्फ गोलू द्वारकाप्रसाद बिजांडे वय ३४ वर्ष दोन्ही रा. तुमसर जि. भंडारा यांचेकडे विकी करण्यास दिल्याचे सांगीतले.



यातील आरोपी क्र १ आकाश किशोर खोब्रागडे याचे अंगझडतीत ०२ मास्टर की व ०१ मोबाईल फोन जप्त करण्यात आला तसेच. गुन्हेशाखा युनिट ५ ने आरोपीसह तुमसर येथे जावुन त्याचे ईतर ०२ साथीदार आकाश संपतलाल परतेकी व मयंक उर्फ किश विनोद बारीक यांना ताब्यात घेतले. तसेच दिपक बाईक रिपेअरींग येथुन आरोपी दिपक द्वारकाप्रसाद बिजांडे व विजय उर्फ गोलू द्वारकाप्रसाद विजांडे यांना ताब्यात घेतले. त्यांचे दुकानासमोर चोरीची काही वाहने दिसुन आली. आरोपींना विचारपूस केली असता त्यांनी काही वाहने आजुबाजुचे गावात विकी करून विक्रीचे पैसे आपसात वाटुन घेतल्याचे सांगीतले. आरोपींनी ज्यांना वाहन विक्री केले त्यांना बोलावुन त्या ईसमांनी खरेदी केलेले चोरीचे वाहने आणुन जमा केले,

नमुद सर्व वाहने जमा करून पाहणी केली असता, आरोपींनी एकूण ६२ दुचाकी वाहने चोरी केल्याचे दिसुन आले. त्यापैकी एकुण ३८ गुन्हे उघडकीस आणलेले आहे.त्यातील नागपूर शहरातील पोलिस ठाणे यशोधरानगर-०२, सदर-०६, कपिलनगर-०३, जरीपटका ०३, लकडगंज ०३ व कोराडी, नंदनवन, गणेशपेठ, कामठी, तहसिल प्रत्येकी ०१ असे एकुण २० वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे, तसेच नागपूर ग्रामीण हद्दीत पोलिस ठाणे रामटेक ०७, कन्हान-०४ असे एकुण ११ वाहन चोरीचे गुन्हे तसेच मध्य प्रदेश, भंडारा, गोंदीया येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. ईतर २४ चोरीची दुचाकी वाहने सुदधा जप्त करण्यात आले असुन त्याबाबत तपास सुरू आहे. सर्व आरोपींना अटक करून त्यांचे ताब्यातुन एकुण ६२ दुचाकी वाहने एकुण किंमती अंदाजे १९,७०,०००/- रू. व ०४ मोबाईल फोन, वाहनांच्या चाबी व मास्टर की असा एकुण २०.४५,२००/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हनजे आरोपी हे गर्दीचे ठिकाणी पार्क करून ठेवलेल्या वाहनावर लक्ष ठेवुन, विशेष करून स्प्लेंडर प्लस दुचाकी वाहने चोरी करीत होते. चोरी केलेल्या वाहनांचे क्रमांक तसेच इंजिन व चेचीस मध्ये बदल करून खोटे बोलुन लोकांना विक्री करीत होते. आरोपी हे मिळालेल्या पैश्यांचा उपयोग ऑनलाईन गेम व जुगार खेळण्याकरीता करीत होते.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त डॅा रविॅद्रकुमार सिंघल,सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)संजय पाटील,पोलिस उपायुक्त(गुन्हे)राहुल माकणीकर,सहा पोलिस आयुक्त(गुन्हेशाखा)अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट ५ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राहुल शिरे,पोउपनि राहुल रोटे,राजेश लोही,पोहवा रुपेश नानवटकर,राजुसिंग राठोड,चंद्रशेखर गौतम,टप्पुलाल चुटे,राजेन्द्र टाकळीकर,नापोशि राजु टाकळकर,प्रविन भगत,अनीस खान,गणेश ठाकरे,अमोल भक्ते,पोशि दिपक बावनकर,देवचंद थोटे,विशाल नागभिडे,लिलाधर खिरडकर,रोशन तांतुळकर,सुनील यादव,सुधीर तिवारी,आशिष पवार यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!